मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या १७ प्रभाग समित्यांपैकी ८ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूका आज संपन्न झाल्या. आठ पैकी सात समित्यांच्या निवडणूका बिनविरोध झाल्या तर एका प्रभाग समितीसाठी निवडणूक झाली. आठ पैकी चार प्रभाग समितीवर भाजपाचे तर तीन समित्यांवर शिवसेनेचे अध्यक्ष निवडुन आले. ‘ए’, ‘बी’ आणि ‘ई’ या एका प्रभाग समितीसाठी निवडणूक होऊन भाजपा पुरस्कृत अखिल भारतीय सेनेच्या उमेदवार गीता गवळी निवडून आल्या. गवळी यांना १२ पैकी ७ मते मिळाली. आज संपन्न झालेल्या निवडणुकीत आठ पैकी पाच प्रभाग समित्यांवर भाजपाचे अध्यक्ष निवडून आले आहेत.
‘सी’ आणि ‘डी’ प्रभाग समिती अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे अतुल शहा, ‘एफ/दक्षिण’ आणि ‘एफ/उत्तर' प्रभाग समिती अध्यक्षपदी शिवसेनेचे सचिन दे. पडवळ, ‘जी/दक्षिण’ प्रभाग समिती अध्यक्षपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर, ‘पी/दक्षिण’ प्रभाग समिती अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे संदिप पटेल, ‘पी/उत्तर’ प्रभाग समिती अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या जया सतनाम सिंग तिवाना, ‘आर/दक्षिण’ प्रभाग समिती अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे शिवकुमार झा, ‘आर/उत्तर’ आणि ‘आर/मध्य’ प्रभाग समिती अध्यक्षपदी शिवसेनेच्या रिद्धी खुरसंगे यांची बिनविरोध निवड झाली. ‘ए’, ‘बी’ आणि ‘ई’, ‘सी’ आणि ‘डी’, ‘एफ/दक्षिण’ व ‘एफ/उत्तर' तसेच 'जी/दक्षिण' प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून उप महापौर हेमांगी वरळीकर यांनी कामकाज पाहिले. तर ‘पी/दक्षिण’, ‘पी/उत्तर’, ‘आर/दक्षिण’, ‘आर/उत्तर’ आणि ‘आर/मध्य’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी कामकाज पाहिले.
No comments:
Post a Comment