मुंबई / जेपीएन न्यूज टीम -
जगभरात डॉ. बाबासहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटामाठात साजरी केली जाते. जयंती म्हटल्यावर सजावट केली जाते. गाणी, ऑर्केष्ट्रा, कव्वाली यासारखे कार्यक्रम आयोजीत केले जातात. मात्र त्याला अपवाद ठरले आहेत घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगर व विक्रोळी येथील भीम अनुयायी. रमाबाई नगर येथील भीम अनुयायांनी सब वे स्वच्छ करून समाज प्रबोधनपर संदेश दिले आहेत तर विक्रोळी येथे रांगोळीमधून बाबासाहेबांचा जीवनपट साकारून बाबासाहेबांना आगळेवेगळे अभिवादन केले आहे.
मुंबईचा घाटकोपर रमाबाई नगर हा भीमसैनिकांचा बालेकिल्ला. या बाले किल्ल्यातील जयंती म्हणजे अनोखीच. दरवर्षी जयंती साजरी केली जात असली तरी आपण काही तरी वेगळे करावे म्हणून येथील युवकांनी युथ फेडरेशनच्या मार्गदर्शनाखाली वर्षाचे बारा महिने अस्वच्छ असलेला सबवे स्वच्छ केला आहे. सब वे स्वच्छ करून युवक गप्पा बसले नाहीत, तर या सब वे मध्ये रंगरंगोटी समाज प्रबोधनपर संदेश आणि उत्तम चित्रे रेखाटली आहेत. "गिरवू अक्षर होऊ साक्षर", "झाडे लावा, झाडे वाचवा", बेटी बचाओ बेटी पढाओ, झाडे तोडू नका असे अनेक समाजोपयोगी संदेश या भिंतींवर रेखाटण्यात आले आहेत. या सब वे मधून रमाबाई आंबेडकर नगर अधिक हजारो नागरिक घाटकोपर रेल्वे स्टेशन कडे ये जा करतात. भिंतीवर रेखाटण्यात आलेले समाजप्रबोधनपर संदेश नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
तसेच विक्रोळीच्या टागोरनगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट रांगोळीतून साकारण्यात आला आहे. गेली १५ दिवस कलाकारांनी शंभर किलो रंगोळीतून सुबक, रेखीव आणि आकर्षक रांगोळी काढली असून त्यातून बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान जवाहरलाल नेहरू यांना सुपूर्द करताना, चवदार तळ्यातून पाणी चाखताना तरुण, भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभ रांगोळीतून हुबेहुब साकारण्यात आला आहे, रांगोळीच्या माध्यमातून बाबासाहेबांनी केलेल्या कर्तृत्वाला पुनर्जीवित करण्यात आले असल्याचे आनंद सेवा संघाचे कार्याध्यक्ष श्रीपाद थोरात यांनी सांगितले. हे रांगोळी प्रदर्शन पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होत आहे.
No comments:
Post a Comment