मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगार भरतीची चौकशी होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 March 2018

मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगार भरतीची चौकशी होणार


मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेने १३८८ जागांसाठी नुकतीच सफाई कामगार भारती केली यामध्ये दहावी पास उमेदवारांना अत्यंत कठीण प्रश्न विचारण्यात आले होते. यावर हरकत घेत हा बहुजन समाजातील उमेदवारांवर केलेला अन्यायाकडे लक्षवेधीत आमदार भाई गिरकर यांनी याची चौकशी करण्याची मागणी आज विधानपरिषदेत केली. ती मान्य करून सभापतींनी सदर संबंधी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश शासनाला दिले.

मुंबई महानगरपालिकेच्या भरतीचा विषय हा नेहमीच चर्चेचा विषय बनलेला असतो. सन २००९ मध्ये झालेल्या भरतीमध्ये बहुतके उमेदवार पास झाल्याने या उमेदवारांनी आपल्यालाच पालिकेची नोकरी मिळावी अशी मागणी केली होती. नोकरी मिळावी म्हणून या उमेदवारांनी अनेक आंदोलने केली. त्यानंतर या उमेदवारांची प्रतीक्षा यादी वेळोवेळी वाढवण्यात आली. त्यानंतर मात्र प्रशासनाने कठोर भूमिका घेत या उमेदवारांची प्रतीक्षा यादी वाढवणार नसल्याचा निर्णय घेतला. हे प्रकरण ताजे असतानाच नुकतीच सफाई कामगारांची भरतीसाठी परिक्षा घेण्यात आली. कामगार सफाईचे काम करणार असल्याने त्यांना शिक्षणाची अट कमी करून त्यांच्या नोकरीपुरता लागतील इतकेच प्रश्न विचारण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही अभ्यासक्रमात कोणताही बदल न करता परिक्षा घेण्यात आली. यामध्ये भारताचे ४४ वे सरन्यायाधीश कोण?, ८८ नक्षत्रांमधील सर्वात विस्तृत नक्षत्र कोणते?, फुलांमध्ये अथवा वनस्पतीमध्ये दुस-या फुलांमधील किंवा वनस्पतींमधील पराग कणांच्या होणा-या परागसिंचनास काय म्हणतात?, गायनेशियम म्हणजे काय?, लोणच्यामध्ये उपयोगात येणा-या विनेगर मध्ये काय असते?, सिरिकल्चर कशाशी संबंधित आहे ?, निशा आणि मिशा यांनी अनुक्रमे २००० आणि २७५० गुंतवणूक करून एक व्यवसाय चालू केला तथापि, मिशा हिला काही महिन्यानंतर आपला पैसा काढावा लागला त्यांच्या परिणामी १२ महिन्यांच्या शेवटचा नफा निशा आणि मिशा यांमध्ये १२:११ या गुणोत्तरांने वाटला गेला निशा हिने आपला पैसा गुंतवून ठेवलेल्या महिन्यांची संख्या किती?, ७२ कि.मी. ताशी या गतीने प्रवास करणारी १ आगगाडी ६ सेंकदात १ पोल ओलांडते ही आगगाडी ४८० मीटर फलाट पार करायला किती वेळ लावेल? इत्यादी अवघड प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांबाबत आक्षेप घेत हे प्रश्न सर्व सामान्य व मागास उमेदवारांना महापालिकेच्या नोकरी पासून दूर ठेवण्यासाठी प्रश्न पत्रिकेत टाकण्यात आले असल्याचे आमदार भाई गिरकर यांनी शंका उपस्थित केली. हा मुद्दा आमदार भाई गिरकर यांनी पॉईंट ऑफ इन्फोरमेशनच्या माध्यमातून उपस्थित करत याबाबत चौकशी करून ह्या भरतीला थागिती देण्यात यावी अशी मागणी केली.

Post Bottom Ad