अनधिकृत बांधकामप्रकरणी मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांचे निलंबन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 March 2018

अनधिकृत बांधकामप्रकरणी मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांचे निलंबन


मुंबई । प्रतिनिधी - मुंबईच्या पायधुनी इस्माईल कर्टे रोडवरील नऊ मजली इमारतीतील अनधिकृत बांधकाम न थांबवता कर्तव्यात कसूर करणाऱ्या महापालिकेच्या सी वार्डचे सहाय्यक आयुक्त तसेच बीट ऑफीसर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, अशी घोषणा नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधान सभेत केली. या संदर्भात हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश विधान सभा अध्यक्षांनीही दिले होते. विधानसभेत घोषणा झाल्याने आता सहाय्यक आयुक्त जीवक घेगडमल यांचे निलंबन केले जाणार आहे.

पायधुनी येथे बेकायदेशिर रित्या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचे संदर्भात सदस्य शरद सोनावणे यांनी प्रश्न उपस्थित केला त्याला उत्तर देताना पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले,याप्रकरणी अनधिकृत बांधकाम करणाऱ्याविरूध्द मुंबई महापालिका अधिनियम व एमआरडीपी कायद्यांर्तंगत कारवाई करण्याची सूचना म्हाडा कार्यालयाने बृहन्मुंबई महापालिकेस केली होती. अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठी महापालिकेमार्फत अधिनियमाच्या कलम 354अ नुसार नोटीस बजाविण्यात आल्या होत्या मात्र या नोटीस नुसार अनधिकृत बांधकाम न थांबविता सी वार्डातील सहायक आयुक्त (वार्ड ऑफीसर), बीट ऑफीसर यांनी कर्तव्यात कसूर व कारवाईत विलंब केल्याने त्यांचे निलंबन केले जाईल. असे डॉ. पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य जयंत पाटील, अजित पवार, राज पुरोहीत, योगेश सागर, सुनील प्रभू, आशिष शेलार, अतुल भातखळकर, पराग अळवणी यांनी चर्चेत सहभाग घेतला.

Post Bottom Ad