मुंबई - अग्निप्रतिबंधात्मक व फायर ऍक्टच्या अनुपालन कामांबाबत तसेच आपल्या इतर मागण्यांसाठी मागील तीन दिवसांपासून अग्निशमन अधिकाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरु केले आहे. याची दखल पालिका प्रशासनाने घेतली असून आज (सोमवारी) यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन युनियनच्या शिष्टमंडळा सोबत चर्चा करणार असल्याचे फायर ब्रिगेड ऑफिसर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश देवदास यांनी सांगितले.
महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवरक्षक अधिनियम २००६ चा उलंघन करीत सदर कायद्यामधील तरतुदी धाब्यावर बसवून अग्नीशमन अधिकाऱ्याना कोणतेही प्रशिक्षण न देता त्यांच्यावर सक्ती केली जाते. याशिवाय अन्य मागण्यांसाठी असहकार आंदोलन सुरू आहे. सोमवारी याबाबत प्रशासनाशी चर्चा होणार आहे. मात्र मागण्यांबाबत समाधानकारक चर्चा सुरू झाली नाही, तर आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची माहिती देवदास यांनी दिली.
काय आहेत मागण्या --
-- महाराष्ट्र फायर ऍक्ट प्रमाणे नामनिर्देशित अधिकारी नेमा .
-- स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) प्रसिद्ध करा .
-- नाहरकत प्रमाणपत्र देताना चेक लिस्ट देण्यात यावी.
-- पुरेसा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी.
-- लिपिकाचे काम अग्निशमन अधिकाऱ्यांना देऊ नये .