पालिकेच्या शाळांतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 March 2018

पालिकेच्या शाळांतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती


मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या सर्वभाषिक शाळांमधील इ. १ ली ते १० वीपर्यंतच्या दिव्यांग विशेष विद्यार्थ्यांसाठी 'मी हुश्शार' शिष्यवृत्ती लागू करण्यात येणार आहे. १ ली ते १० वीपर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ही शिष्यवृत्ती देण्याचा प्रस्ताव शिक्षण समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला.

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांना विनाअट प्रवेश दिला जातो. महापालिकेच्या ८ भाषिक नियमित शाळांमध्ये शिकणारे ३ हजार ९५२ दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. प्रति विद्यार्थी इ. १ ली ते ४ थीपर्यंत १०० रुपये दरमहा १० महिन्यांसाठी, इ. ५ वी ते ७ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरमहा १५० रुपये १० महिन्यांसाठी आणि इ. ८ वी ते १० वी पर्यंतच्या २०० रुपये दरमहा १० महिन्यांसाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. एकूण ३ हजार ९५२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी ५२ लाख ४३ हजार रुपये रक्कम देण्यात येणार आहे. प्राथमिक विभागासाठी ४८ लाख ६५ हजार रुपये आणि माध्यमिक विभागासाठी ३ लाख ७८ हजार रुपये देण्यात येणार आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात दिव्यांग व्यक्तीसाठी झालेला समान हक्क, समान संधी व संपूर्ण सहभागाचा अधिनियम १९९५ कायद्यान्वये दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणामध्ये गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी देण्याच्या व्यापक उद्देशाने तयार करण्यात आली आहे.

Post Bottom Ad