१ कोटीचा कर थकवला, दाऊदच्या आईची मालमत्ता सिल होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 March 2018

१ कोटीचा कर थकवला, दाऊदच्या आईची मालमत्ता सिल होणार

मुंबई - कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या आईच्या नावावर आमना मार्केट, फोर्ट येथे असलेल्या मालमत्तेचा कोट्यवधींचा कर वारंवार नोटीस देऊनही भरण्यात आलेला नाही. १,२५,८७,०९९ इतका कर थकीत आहे. त्यामुळे हा कर ४८ तासांत भरा, अन्यथा मालमत्ता सिल करण्यात येईल अशी नोटीस पालिकेने पाठवली आहे. फोर्ट येथील या मालमत्तेचा कर १९९६ पासून भरण्यात आलेला नाही. हा मालमत्ता कर भरण्यासाठी पालिकेने वारंवार नोटीसही पाठवली. मात्र अद्याप हा कर भरण्यात आलेला नाही. या ठिकाणी आधी एक आईस फॅक्टरी होती. त्यानंतर या जागेचा एका बिल्डरने पुनर्विकास करण्याचा प्रयत्न एका बिल्डरने केला होता. मात्र दरम्यान त्याला अटक करण्यात आली होती. सद्यस्थितीत या ठिकाणी शंभरहून अधिक दुकाने आणि वेगवेगळी कार्यालये आहेत.

Post Bottom Ad