मुंबई । प्रतिनिधी - नोकर भरतीवरील बंदी उठवा, रिक्त जागा भरा, शैक्षणिक पात्रतेनुसार काम द्या इत्यादी मागण्यांसाठी डीवायएफआय व एसएफआय या विद्यार्थी संघटनांनी विधानभवनावर मोर्चा काढला होता. मात्र हा मोर्चा पोलिसांनी आझाद मैदान परिसरात अडवल्याने हजारो विद्यार्थ्यांनी महापालिका मुख्यालयासमोर रास्तारोको केला.
डीवायएफआय व एसएफआय या डाव्या विद्यार्थी संघटनांनी आज शुक्रवारी विधानभवनावर मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चात हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. हजारो विद्यार्थ्यी आझाद मैदानाकडून विधानभवनाकडे चाल करून जाऊ लागले होते. मात्र मुंबई पोलिसांनी हस्तक्षेप करत मोर्चा आझाद मैदान आणि महापालिका मुख्यालयासमोर अडवला. मोर्चा अडवल्याने अनेक विद्यार्थी संतप्त झाले होते. मोर्चा पुढे जाऊ देत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. काही आंदोलनकर्ते रस्त्यावर झोपल्याने रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी बॅरिकेट्स लावून मोर्चेकऱ्यांना अडवल्याने महापालिका मुख्यालय ते मेट्रो सिनेमापर्यंतची वाहतूक बंद झाली होती. याच दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत घालत सर्वाना आझाद मैदानात पाठवले. त्यांनतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या मागण्या -
- नोकरभरतीवर घातलेली बंदी उठवा.
- तीन लाखाहून अधिक नोंदणीकृत रिक्त जागा त्वरित भरा.
- शहरी रोजगार हमी योजना सुरू करा.
- तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार काम द्या.
- एससी-एसटीचा अनुशेष त्वरित भरा.
- सरकारी शाळा बंद करण्याचे कारस्थान त्वरित थांबवा.
- तीन लाखाहून अधिक नोंदणीकृत रिक्त जागा त्वरित भरा.
- शहरी रोजगार हमी योजना सुरू करा.
- तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार काम द्या.
- एससी-एसटीचा अनुशेष त्वरित भरा.
- सरकारी शाळा बंद करण्याचे कारस्थान त्वरित थांबवा.