राज्य सरकारचे पालिकेला लेखी आदेश -
मुंबई । प्रतिनिधी - एक हजारांवर फाइल्स गहाळ करून मोठा घोटाळा करणाऱ्या अधिकाऱयांचीं त्वरीत चौकशी करा असे लेखी निर्देश राज्य सरकारने पालिका प्रशासनाला दिले आहेत. या भ्रष्टाचारात २६१ विभागांतील तब्बल २००१ अधिकारी-कर्मचार्यांचा समावेश आहे. एक हजारांवर फाइल्स जाणीवपूर्वक गहाळ केल्याचा ठपका अधिकाऱयांवर ठेवण्यात आला आहे. पालिकेच्या विविध प्रकरणांच्या फाईल्स गहाळ केल्याप्रकरणी काही नगरसेवकांनी राज्य सरकारकडे तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणातील सर्व अधिकार्यांची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र याबाबतची चौकशी रखडली होती. या पार्श्वभूमीवर अधिकारी-कर्मचार्यांची चौकशी करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याची तक्रार सरकारच्या ग्रामीण विकास विभागाकडे करण्यात आली होती. राज्य सरकारने आदेश देऊनही चौकशी रखडल्यामुळे जाणीवपूर्वक दिरंगाई करणार्या अधिकार्यांची चौकशी करा अशी मागणीही नगरसेवकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या ग्रामीण विकास खात्याकडून गेल्या ८ मार्चला लेखी आदेश देऊन तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.