१ एप्रिलपासून भाडेवाढ लागू -
मुंबई | प्रतिनिधी - बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पालिका आयुक्तांनी सुचवलेल्या कृती आराखड्याचा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेने घाईगडबडीत मंजुर करून घेतला. त्यामुळे १ एप्रिलपासून बेस्टची भाडेवाढ होणार असून मुंबईकर नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. या भाडेवाढीचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांबरोबरच शालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही बसणार आहे. बस तिकीट दरवाढीबरोबरच दैनंदिन बसपास दरातही वाढ होणार आहे. यामध्ये सुमारे २० रुपयांची वाढ होणार आहे. तर शालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन विध्यर्थ्यांच्या बसपास दरात ५० रुपये वाढ होणार आहे.
बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने महापालिका आयुक्तांकडून कामकाजात सुधारणा करण्याचे सुचवले होते. त्यानुसार बेस्ट उपक्रमाने कृती आराखडा तयार केला होता. या आराखड्याला बेस्ट उपक्रमाने मंजुरी दिल्यानंतर पालिका सभागृहाची मंजुरी आवश्यक होती. सभागृहाची मंजुरी आवश्यक होती. कृती आराखड्याद्वारे कर्मचाऱ्यांचे भत्ते गोठवले जाणार असल्याने त्याला सर्वच राजकीय पक्षांचा विरोध होता. त्यामुळे सभागृहात हा आराखडा मंजुरीसाठी ठेवला जात नव्हता. मात्र शनिवारी तातडीचे कामकाज म्हणून विरोधी पक्षांना विश्वासात न घेता सभागृहासत सादर करून मंजूर करून घेतला. कृती आराखड्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याने बेस्ट कर्मचारी अधिकारी यांचे सर्व प्रकारचे भत्ते गोठवले जाणार आहेत.
सत्ताधारी शिवसेनेने कृती आराखडा मंजूर केल्याने बेस्टची दरवाढ झाली आहे. पहिल्या ४ कि.मी. पर्यंत सध्या आहे तेच भाडे राहणार असून त्यानंतरच्या प्रत्येक टप्प्यासाठी १ ते १२ रुपयांपर्यंत भाडेवाढ होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या बसपासमध्ये ५० ते १०० रुपयांनी वाढ झाली आहे. बसपासमध्येही ४ कि.मी.च्या पुढच्या प्रवाशांसाठी ४० ते ३५० रुपयांनी वाढ झाली आहे. कृती आराखड्यात काटकसरीचे धोरण असल्याने बसचे २४० बसमार्गही बंद होणार आहेत. बेस्टकडे एकूण ३७९० बस गाड्यांचा ताफा असून बस ताफ्यातील ४५३ बसेस मोडीत काढून बस गाड्यांचा ताफा ३३३७ एवढाच ठेवण्यास या प्रस्तावामुळे मंजुरी मिळाली आहे. यापुढे बसचा ३३३७ एवढाच बस ताफा राहणार आहे. बस ताफ्यातून १७०३ बस गाड्या मोडीत काढून यापैकी १२५० बस गाड्या भाडेतत्वावर समाविष्ठ करण्यासही या प्रस्तावाच्या माध्यमातून मंजुरी मिळाली आहे.
बेस्ट भाडेवाढीस काँग्रेसचा विरोध -
पालिका सभागृहात बेस्ट भाडेवाढीचा प्रस्ताव सत्ताधारी पक्षाने विरोधकांना अंधारात ठेऊन एकतर्फी मंजूर केला. हा निर्णय मुंबईकरांच्या हिताच्या विरुद्ध आहे. तातडीचे कामकाज घेताना गटनेत्यांना विश्वासात घेण्याची प्रथा आहे. मात्र आज सर्वाना अंधारात ठेऊन कोणतीही सूचना न देता घाईगडबडीत सदर प्रस्ताव मंजूर करून सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीचा खून केला आहे. शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन विध्यार्थ्यांच्या बसपास दरात वाढ केल्याने याचा फटका सर्वसामान्य विध्यार्थ्यांना बसणार आहे. एकीकडे दरवाढ करत असताना ४० टक्के बसेस बंद केल्या जाणार आहेत. याला कोण जबाबदार राहणार आहे ? या भाडेवाढीमुळे सर्वसामान्य प्रवाशांचे कंबरडे मोडणार आहे.
- रवी राजा, विरोधी पक्ष नेते
बेस्टला वाचविण्यासाठीच बेस्ट भाडेवाढ -
बेस्टची आर्थिक परिस्तिथी हलाखीची असल्याने बेस्टला सावरण्यासाठी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अनेक सूचनांसह बेस्ट भाडेवाढीचा प्रस्ताव मांडला होता. बेस्टला आर्थिक खाईतून बाहेर काढण्यासाठी या सूचनांची अंमलबजावणी करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. याचाच विचार करून बेस्ट समितीतही एकमताने बेस्ट भाडेवाढीसह या सूचनांना मंजुरी देण्यात आली होती. तोच प्रस्ताव आज पालिका सभागृहात तातडीचे कामकाज म्हणून मंजूर केला गेला.
- यशवंत जाधव, सभागृह नेते
कामगारांना जागविण्यासाठीच कटू निर्णय -
बेस्टला आर्थिक खायीतून बाहेर काढण्यासाठी मनाला न पटणारे निर्णय घेण्याची पाळी आज आमच्यावर आली असून भविष्यात बेस्ट उपक्रम टिकणे हे महत्वाचे आहे . मीही बेस्ट कामगार होतो त्यामुळे मला कामगारांप्रती पूर्ण जाणीव आहे. आर्थिक परिस्तिथीमुळे माझ्या बेस्ट कामगारांना वेळेवर पगार मिळणे हि कठीण झाले आहे. बेस्ट उपक्रम टिकला तर कामगार जगेल. हे लक्षात घेऊन माझ्या कामगारांना जगविण्यासाठी आम्हाला हा बस भाडेवाढीचा कटू निर्णय घ्यावा लागत आहे. बेस्टचा अर्थसंकल्प पालिका अर्थसंकल्पात विलीन करण्यास पालिका सभागृहात सर्वपक्षीय नेत्यांनी सहकार्य केले आहे.
- अनिल कोकीळ, अध्यक्ष बेस्ट समिती

अशी होणार दरवाढ -
कि मी सध्याचे बसभाडे सुधारित बसभाडे
२ ८. ०० रु ८ . ०० रु
४ १० . ०० १० . ००
६ १४ . ०० १५. ००
८ १६. ०० १८. ००
१० १८. ०० २२. ००
१२ २० . ०० २५ .००
१४ २२. ०० २८. ००
१७ २४ . ०० ३२ . ००
२० २६ . ०० ३४ . ००
२५ २८ . ०० ३७ . ००
३० ३० . ०० ४२ . ००
३५ ३६ . ०० ४७ . ००
४० ४२ . ०० ५२ . ००
४५ ४६ . ०० ५७ . ००