मुंबई । प्रतिनिधी - ओखी वादळामुळे वातावरणात बदल झाल्याने सोमवारी अचानक मुंबईत तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे मुंबईकरांची धावपळ उडाली. पावसाचा हा जोर पुढील तीन दिवस वाढण्याची शक्यता आहे. शिवाय, समुद्रात ४.९५ ते ५.५ मीटरच्या लाटा उसळणार असल्याने हे दिवस मुंबईकरांसाठी धोक्याचे असल्याचा इशारा कुलाबा हवामान खात्याने दिला आहे.
ओखी वादळामुळे राज्यासह कोकण, गोव्यात सोमवारी काही ठिकाणी जोरदार पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे परतीच्या मार्गावर निघालेल्या मुंबईकरांची तारांबळ उडाली. रेल्वे व रस्ते वाहतूकीवर थोडाफार परिणाम जाणवला. येत्या तीन दिवसांत पुन्हा मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, तुफानी वार्यांमुळे समुद्राला उधाण येणार असून पाच मीटरच्या लाटा उसळतील. यामुळे अनेक ठिकाणी बोटीही भरकटण्याची शक्यता असून मच्छीमारांना अरबी समुद्रात जाण्याच मनाई करण्यात आले आहे. तसेच सर्वच यंत्रणांना सतर्केचा इशारा वेध शाळेकडून देण्यात आला आहे.
धोक्याचे दिवस
दिनांक भरतीची वेळ लाटांची उंची
५ डिसेंबर १२.५८ मध्यरात्री ५.०४ मीटर
१२. ४३ दुपारी ४.३५ मीटर
६ डिसेंबर १.४३ मध्यरात्री ५.०५ मीटर
१.३२ दुपारी ४.२९ मीटर
७ डिसेंबर २.२८ मध्यरात्री ४.९६ मीटर
२.२१ दुपारी ४.१२ मीटर