मुंबई | प्रतिनिधी -
पश्चिम उपनगरांतील दुरावस्था झालेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. पालिका यावर २१८ कोटी ८६ लाख ३२ हजार रुपये खर्च करणार असून प्रशासनाने तसा प्रस्ताव येत्या बुधवारी स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवला आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ, खासगी संस्थांद्वारे सातत्याने खोदण्यात येणारे चर, जलवाहिन्यांना लागलेली गळती, पर्जन्य वाहिन्यांचे अपूर्ण जाळे, रस्त्यांची होणारी झीज, रस्त्याला पडणाऱ्या भेगा आणि पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे यामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. काही ठिकाणच्या रस्त्यांवरील पेव्हरब्लॉक उखडल्याने ही नागरिकांना येथून ये- जा करण्यास अडचणी येतात. वाहतुकीचा खोळंबा ही होतो. उपनगरात हे प्रमाण अधिक आहे. यामुळे रस्त्यांच्या दुरावस्थेप्रकरणी विरोधकांकडून सत्ताधारी शिवसेना व प्रशासनावर वांरवार टीकेचे धनी बनाव लागते. यावर उपाय म्हणून उपनगरातील प्रशासनाने आर मध्य, आर उत्तर, पी दक्षिण, पी उत्तर, पी दक्षिणमधील गोरेगाव पूर्व, एच पूर्व या वॉर्डांमधील विविध मोठ्या व छोट्या रस्त्यांचे डांबरीकरणाने पुन:र्पृष्ठीकरण करुन सुधारणा करणे, विविध रस्ते व सिमेंट काँक्रिट रस्त्यांलगतच्या पट्ट्यांची आणि पदपथांची (फुटपाथ) सुधारणा करणे, विविध रस्त्यांलगतच्या पट्ट्यांची सुधारणा करणे ही कामे केली जाणार आहेत. पालिकेने तसे १२ प्रस्ताव येत्या स्थायी समितीत मंजुरीसाठी आणले असून यासाठी तब्बल २१८ कोटी ८६ लाख ३२ हजार रुपये मोजणार आहे.
No comments:
Post a Comment