भीम अनुयायांसाठी उभारलेला मंडप कोसळला, ३ जण जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 December 2017

भीम अनुयायांसाठी उभारलेला मंडप कोसळला, ३ जण जखमी


मुंबई । प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यास आलेल्या अनुयायांच्या निवासासाठी दादर शिवाजी पार्क येथे बांधण्यात आलेला मंडप मंगळवारी रात्री कोसळला. ओखी वादळामुळे मुंबईत सोमावरी सायंकाळपासून पाऊस सुरु आहे. या पावसात हा मंडप भिजला होता. तसेच मंडपावर पाणीही साचले होते. यामुळे हा मंडप कोसळला असून या दुर्घटनेत तीन जन जखमी झाले आहेत.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महानगरपालिकेकडून अनेक सोयी सुविधा पुरवल्या जातात. या सोयी सुविधा पुरवताना महापालिका आणि कंत्राटदाराने ओखी वादळाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले होते. सोमवारपासून पाऊस पडत असतानाही शिवाजी पार्क परिसरात भीम अनुयायांना पावसापासून वाचण्यासाठी हवे तसे प्रयत्न करण्यात आले नव्हते. मंगळवारी सकाळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थितीत माहहती पुस्तिकेचे प्रकाशन केल्यावर पालिकेचा नियंत्रण कक्षाचे छत कोसळले होते. हि घटना ताजी असतानाही योग्य काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास शिवाजी पार्क येथे अनुयायांसाठी उभारलेला एक लाख चौरस फुटाचा मोठा मंडप कोसळला. या दुर्घटनेत यमुनाबाई खंदारे (४०), महादेव खांदारे (५५) व निलेश भंडारी (२८) हे तिघेजण जखमी झाले आहेत. या तिघांना तातडीने, पालिकेच्या सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी आंबेडकरी संघटनांकडून केली जात आहे.

Post Bottom Ad