पालिका आयुक्तांपुढे सत्ताधारी शिवसेनेने नांगी टाकली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 December 2017

पालिका आयुक्तांपुढे सत्ताधारी शिवसेनेने नांगी टाकली


महापौर व सभागृह नेत्यांवर शिवसेनेच्या नगरसेविका नाराज
मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेने विकास आराखड्या बाबत बनवलेले ॲप व पालिकेच्या नव्या संकेतस्थळाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले. या कार्यक्रमाला महापौर आणि इतर नगरसेवकांना विश्वासात न घेतल्याने संतप्त झालेल्या सत्ताधारी शिवसेनेने सभागृह नेत्यांमार्फत पालिका सभागृहात चर्चा घडवून आणली. यावेळी पालिका आयुक्तांनी माफी मागावी अशी मागणी लावून धरण्यात आली. अखेरच्या क्षणी महापौर आणि सभागृह नेत्यांनी यावर पडदा पाडला. शिवसेनेला आयुक्तांना आपल्यापुढे झुकवण्याची चालून आलेली संधी सोडून दिली आहे. यामुळे पालिका आयुक्तांपुढे सत्ताधारी शिवसेनेने नांगी टाकल्याची चर्चा पालिकेत आहे.

मुंबई महापालिकेचे आधुनिक संकेतस्थळ MCGM 24 x 7 व One MCGM GIS ॲपचाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ६ डिसेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आला. या कार्यक्रमाला नगरसेवक, गटनेते, उप महापौर तसेच मुंबईचे प्रथम नागरिक महापौर यांनाही निमंत्रण देण्यात आले नव्हते. यामुळे पालिका सभागृहाचा आणि मुंबईच्या प्रथम नागरिकाचा अपमान झाल्याने पालिका आयुक्तांनी सभागृहाची माफी मागावी अशी मागणी सभागृह नेते यशवंत जाधव यांनी एका निवेदनाद्वारे केली. यावेळी बोलताना पालिका आयुक्तांना एकाद्या ॲपचे उदघाटन करावयाचे होते तर ६ डिसेंबर हा बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन होता. हा दुःखाचा दिवस का निवडला असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला. यावर काँग्रेसचे रवी राजा, मेहर हैदर, अश्रफ आझमी, सुफियान वणू, राष्ट्र्रवादीच्या सईदा खान, कप्तान मलिक, समाजवादीचे रईस शेख यांनी पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावरील अंकुश कमी झाला असल्याचा आरोप केला. पालिका प्रशासनावर विश्वास नसेल तर पालिका आयुक्तांविरोधात सत्ताधारी शिवसेनेने अविश्वास ठराव आणावा आम्ही त्याला पाठिंबा देऊ असे आवाहन विरोधकांनी केले.

दरम्यान याबाबत खुलासा करताना पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मी गेले ३४ वर्षे सरकारी सेवेत सनदी अधिकारी म्हणून काम करत आहे. मला सभागृह आणि लोकप्रतिनिधींचे अधिकार माहित आहे. पालिकेने मुंबईचा प्रारूप आराखडा बनवला आहे. तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सुचविल्या प्रमाणे पारदर्शकता असावी म्हणून डिजिटल ॲप बनवले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणले असता मुख्यमंत्र्यानी ॲपचे त्वरित लोकार्पण करावे असे सांगितल्याची माहिती आयुक्तांनी दिली. याच दरम्यान पालिका आयुक्तांचा निषेध करत असल्याचे वाक्य सभागृह नेत्यांनी आपल्या निवेदनातून परत घ्यावे असे आवाहन आयुक्तांनी केले. दरम्यान याबाबत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी नगरसेवकांना ॲप दाखवलं असत तर बर झालं असत. यापुढे अशा घटना घडू नये याची दाखल घ्यावी असे निर्देश आयुक्तांना देत या प्रकरणावर पडदा पाडला. तर सभागृह नेते यशवंत जाधव यांनी तुम्ही माफी मागितली नाही तरी आम्ही मोठ्या मनाने तुम्हाला माफ केले आहे. पुन्हा असे प्रकार घडू नयेत असे असे आयुक्तांना उद्देशून म्हटल्याने शिवसेनेच्या नगरसेविका संतप्त झाल्या. या संतप्त झालेल्या शिवसेनेच्या महिला नगरसेविकांनी आपल्याच पक्षातील सभागृह नेते आणि महापौरांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत सभागृहाबाहेर जाण्याचे पसंद केले.

शिवसेनेच्या नगरसेविका आयुक्तांच्या दालनात घुसल्या -
पालिका सभागृहात आयुक्तांविरोधात चर्चा सुरु होती. पालिका आयुक्तांना सभागृहात बोलावले जात होते. मात्र आयुक्त एका मिटिंगमध्ये व्यस्त असल्याचे सांगण्यात येत होते. आयुक्त सभागृहात येत नसल्याने संतप्त झालेल्या शिवसेनेच्या नगरसेविका पालिका आयुक्तांच्या दालनात घुसल्या. आयुक्त सभागृहात कसे येत नाहीत त्यांना घेऊनच जाऊ असे बोलले जात होते. उपायुक्त रमेश पवार मी आयुक्तांना नितरोप देतो दोन मिनिटात घेऊन येतो असे या नागरसेविकांना समजवत होते. या नगरसेविका ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. आयुक्तांना सोबत नेण्यासाठी काही नगरसेविका आयुक्तांच्या दालनाबाहेर बसल्या होत्या. मात्र पवार यांच्या जंटलमन प्रॉमिस वर या नगरसेविका सभागृहाकडे निघाल्यावर पालिका आयुक्त सभागृहात आले.

Post Bottom Ad