अन्यथा आंबेडकरी जनतेच्या विरोधाला सामोरे जावे लागेल - आनंदराज आंबेडकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 December 2017

अन्यथा आंबेडकरी जनतेच्या विरोधाला सामोरे जावे लागेल - आनंदराज आंबेडकर


मुंबई ।अजेयकुमार जाधव -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी प्राधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदू मिल मधील स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र दोन वर्षे झाली तरी अद्याप स्मारकाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधताना आंबेडकरी समाजाला विश्वासात घेऊन काम करावे अन्यथा आंबेडकरी जनतेच्या विरोधाला सामोरे जावे लागेल असा इशारा रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिला आहे. इंदू मिलमधील डॉ. आंबेडकर आणि भगवान बुद्धांच्या मूर्त्यांना अभिवादन केल्या नंतर ते आंबेडकरी जनतेला संबोधित करत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ६ डिसेंबर २०११ ला इंदू मिलवर आंबेडकरी समाजाने कब्जा केला होता. २४ दिवसाच्या आंदोलनानंतर सरकारने इंदूमिलच्या जमिनीवर आंबेडकर स्मारक बनवण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर सरकार बदलले आणि २०१५ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सहा महिन्यात काम सुरु करू असे सांगण्यात आले. मात्र दोन वर्षे झाली तरी अद्याप स्मारकाचे काम सुरु झालेलं नाही. बाबासाहेबांचे स्मारक उभे राहावे म्हणून आंबेडकरी समाजातील काही संघटनांनी नुकतेच आंदोलने होत आहेत. तरीही सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. स्मारक उभारण्याच्या प्रक्रियेत आंबेडकरी संघटनांना विश्वासात घेतले जात नाही असा आरोप आनंदराज यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जमीन देण्याचे घोषणा करण्यात आली मात्र अद्याप स्मारकाचे काम सुरु केले जात नाही. सरकारला आंबेडकर स्मारक बांधायचे नसल्यास इंदू मिलची जमीन आंबेडकरी जनतेच्या नावे करावी. आंबेडकरी जनता स्वतःच्या खर्चाने स्मारक उभारेल असे आनंदराज यांनी सांगितले.

यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना माणूस म्हणू जगण्याचा अधिकार दिला आहे. बाबासाहेबांनी लोकांना संकल्प दिला आहे. लोकांना विचार दिले आहेत. यामुळे बाबासाहेबांचे स्मारक त्यातोडीचे व्हावे. या स्मारकामधून लोक चांगले विचार घेऊन बाहेर पडले पाहिजे असे स्मारक लवकरात लवकर उभारले जावे अशी मागणी केली. तर माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी बाबासाहेबांचे विचार या स्मारकामधून मिळाले पाहिजे. सरकारने स्मारकासाठी टेंडर काढले आहे. त्यासाठी २० टक्के अधिकची एकानेच बोली लावली आहे. यामुळे सरकारने याबबाबत लवकरात लवकर स्मारकाबाबत निर्णय घ्यावा सारे आवाहन त्यांनी केले. सरकारने स्मारक बांधण्याचे वचन दिले होते. या वचनाची आठवण करून देण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. आमच्यावर आंदोलनाची वेळ आणू नका असा इशारा गायकवाड यांनी यावेळी दिला. यावेळी राजू वाघमारे, विरोधी पक्ष नेते रवी राजा, रिपब्लिकन सेनेचे रमेश जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

एक महिन्यात स्मारकाचे काम सुरु - 
इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक निर्माण करण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून एक महिन्याच्या आत स्मारकाचे काम सुरु करण्यात येईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार दिला. संविधानामुळे शक्तीशाली देश निर्माण झाला. जगात भारताकडे कौतुकाने पाहिले जाते. देशातील दिन दलित, इतर मागासवर्गीय शेतकरी अशा शेवटच्या घटकांपर्यत परिवर्तन करण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून शस्त्र दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले समतेचे राज्य निर्माण करण्याचे कार्य करण्यात येत आहे. 
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 

Post Bottom Ad