मुंबई । प्रतिनिधी - भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी येतात. या भीम अनुयायांना दादर चैत्यभूमी येथे पोहचण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे 5 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 12 विशेष लोकल गाड्या चालवण्यात येणार आहेत.
6 दिसंबर 2017 रोजी चैत्यभूमी दादर, मुंबई येथे भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येत येणा-या त्यांच्या अनुयायांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे द्वारा दादर ते कुर्ला, ठाणे,कल्याण आणि कुर्ला ते मानखुर्द, वाशी,पनवेल मार्गावर दिनांक 6 डिसेंबर (5 व 6 डिसेंबरच्या मध्यरात्री) रोजी 12 उपनगरीय विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष लोकल गाड्या सर्व स्थानकावर थांबतील. या विशेष ट्रेनमुळे राज्यभरातून चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत येणे सोयीचे होणार आहे. या गाड्यांचा लाभ मध्य प्रदेश तसेच कर्नाटकातून येणाऱ्या नागरिकांंनाही होणार आहे. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी वैध तिकिटांनी प्रवास करावा, असे आवाहनही मध्य रेल्वेने केले आहे.
मेन लाइन डाउन उपनगरीय गाड्या -
दादर-ठाणे विशेष लोकल दादरहून 01.15 वाजता सुटेल आणि 01.55 वाजता ठाणे पोहचेल.
दादर-कल्याण विशेष लोकल दादरहून 02.25 वाजता सुटेल आणि 03.35 वाजता कल्याण पोहचेल.
दादर-कुर्ला विशेष लोकल दादरहून 03.00 वाजता सुटेल आणि 03.15 वाजता कुर्ला पोहचेल.
मेन लाइन अप उपनगरीय गाड्या -
दादर-कल्याण विशेष लोकल दादरहून 02.25 वाजता सुटेल आणि 03.35 वाजता कल्याण पोहचेल.
दादर-कुर्ला विशेष लोकल दादरहून 03.00 वाजता सुटेल आणि 03.15 वाजता कुर्ला पोहचेल.
मेन लाइन अप उपनगरीय गाड्या -
कुर्ला-दादर विशेष लोकल कुर्लाहून 00.45 वाजता सुटेल आणि 01.00 वाजता दादर पोहचेल.
कल्याण-दादर विशेष लोकल कल्याणहून 01.00 वाजता सुटेल आणि 02.10 वाजता दादर पोहचेल.
ठाणे-दादर विशेष लोकल ठाणेहून 02.10 वाजता सुटेल आणि 02.50 वाजता दादर पोहचेल.
हार्बर लाइन डाउन उपनगरीय गाड्या -
कल्याण-दादर विशेष लोकल कल्याणहून 01.00 वाजता सुटेल आणि 02.10 वाजता दादर पोहचेल.
ठाणे-दादर विशेष लोकल ठाणेहून 02.10 वाजता सुटेल आणि 02.50 वाजता दादर पोहचेल.
हार्बर लाइन डाउन उपनगरीय गाड्या -
कुर्ला-मानखुर्द विशेष लोकल कुर्लाहून 02.30 वाजता सुटेल आणि 02.50 वाजता मानखुर्द पोहचेल.
कुर्ला-पनवेल विशेष लोकल कुर्लाहून 03.00 वाजता सुटेल आणि 04.00 वाजता पनवेल पोहचेल.
कुर्ला-वाशी विशेष लोकल कुर्लाहून 04.00 वाजता सुटेल आणि 04.35 वाजता वाशी पोहचेल.
हार्बर लाइन अप उपनगरीय गाड्या -
कुर्ला-पनवेल विशेष लोकल कुर्लाहून 03.00 वाजता सुटेल आणि 04.00 वाजता पनवेल पोहचेल.
कुर्ला-वाशी विशेष लोकल कुर्लाहून 04.00 वाजता सुटेल आणि 04.35 वाजता वाशी पोहचेल.
हार्बर लाइन अप उपनगरीय गाड्या -
वाशी-कुर्ला विशेष लोकल वाशीहून 01.30 वाजता सुटेल आणि 02.10 वाजता कुर्ला पोहचेल.
पनवेल-कुर्ला विशेष लोकल पनवेलहून 01.40 वाजता सुटेल आणि 02.45 वाजता कुर्ला पोहचेल
मानखुर्द-कुर्ला विशेष लोकल मानखुर्दहून 03.10 वाजता सुटेल आणि 03.30 वाजता कुर्ला पोहचेल.
पनवेल-कुर्ला विशेष लोकल पनवेलहून 01.40 वाजता सुटेल आणि 02.45 वाजता कुर्ला पोहचेल
मानखुर्द-कुर्ला विशेष लोकल मानखुर्दहून 03.10 वाजता सुटेल आणि 03.30 वाजता कुर्ला पोहचेल.