कफ परेड समुद्र किनारी 300 एकर जागेवर भराव टाकून होणार सुशोभीकरण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 November 2017

कफ परेड समुद्र किनारी 300 एकर जागेवर भराव टाकून होणार सुशोभीकरण

मुंबई | प्रतिनिधी -
मुंबईच्या कफ परेड येथील समुद्र किनाऱ्याचे न्यूयॉर्क सेंटर पार्क प्रमाणे सुशोभिकरण करण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या विचाराधीन आहे. त्यासाठी सर्वेक्षणाकरिता महापालिका नॅशनल एनव्हॉरमेंटल इंजिनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट आणी नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियनग्राफी या दोन स्वयंसेवी संस्थांची नियुक्ती करणार आहे. या संस्था याचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून महापालिकेसमोर अहवाल सादर करणार आहेत. महापालिकेच्या नियोजनानुसार कफ परेड येथील समुद्रकिनाऱ्यावर 399 एकर पर्यंत समुद्रावर भराव टाकून त्यावर सुशोभीकरण करण्यात येणार आहे. 2014 च्या विकास आराखड्यानुसार भराव टाकलेला भाग पुढे न्यूयॉर्क सेंट्रल पार्क प्रमाणे विकसित करण्यात येणार आहे.

या भागावर भराव टाकण्यापूर्वी भविष्यात होणाऱ्या वाहतुकीचे, पादचाऱ्यांचे नियोजन कसे करावे तसेच मासेमारांसाठी बोटी उभ्या करण्यासाठी पर्यायी जागा कुठे असणार इत्यादी मुद्द्यांचाही सखोल अभ्यास करण्यात येणार आहे. त्याच्यबरोबर या ठिकाणी किती बांधकामे उभारण्यात येऊ शकतात, याचाही अभ्यास करण्यात येणार आहे. मेट्रो 3 च्या खोदकामातून उपलब्ध झालेल्या मातीचा भराव या रेक्लेमेशनसाठी वापरण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ओशिओनोग्राफी ही संस्था समुद्राच्या अंतर्गत भागाचा अभ्यास करणार आहे. भराव टाकल्यास त्याचा भरतीच्या वेळेस काय परिणाम होऊ शकतो, त्याने समुद्र जीवांवर व समुद्राखालील जीवनावर कोणता परिणाम होऊ शकतो या दिशेने अभ्यास करणार आहे. तर नॅशनल एनव्हॉरमेंटल इंजिनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट ही संस्था भराव टाकल्यानंतर त्या भूभागाच्या दर्जाबद्दल अभ्यास करणार आहे. यामध्ये या भागाच्या सुशोभीकरणाचाही आराखडा अंतर्भूत असणार आहे. भराव टाकलेल्या भूभागावर वनस्पती जीवन कसे असेल याचाही अभ्यास करण्यात येणार आहे.

Post Bottom Ad