पालिकेतील भरतीचा मार्ग मोकळा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 November 2017

पालिकेतील भरतीचा मार्ग मोकळा


मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत नोकरी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. हि इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे. सन २००९ नंतर पालिकेतील भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या भरतीमध्ये प्रशिक्षणार्थींना कोटा ठेवण्यात येणार आहे. न्यायालयात गेलेल्या ९०५ उमेदवारांचा प्रश्न उद्भवल्यास आणखी रिक्त असलेल्या जागा भरण्यात येतील असे स्पष्टिकरण अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी दिले. यामुळे स्थायी समितीने भरतीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

पालिकेत २००९ मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेतील ९०५ उमेदवारांचे प्रकरण न्यायालयात आहे. प्रशिक्षणार्थींना प्राधान्य देण्याची तरतूद नसताना पालिकेने तेराशेहून अधिक पदांची भरती जाहीर केली होती. यावर शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी जोरदार आक्षेप घेत ‘आधी जुन्या भरतीचा वाद संपवा, नंतरच नवीन भरती करा’ अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीच्या मागील बैठकीत भरतीचा प्रस्थाव थांबवून ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव सुधारित तरतुदींसह नव्याने स्थायी समितीत मांडण्यात आला. यावेळी स्थायी समिती सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रशासनाची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी दिले. यावर अतिरिक्त आयुक्तांनी दिलेल्या स्पष्टिकरणामुळे भरतीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. प्रस्तावित भरतीमध्ये पालिका रुग्णालये, पाणी खाते, सफाई विभाग आणि प्रशासकीय विभागात ही भरती केली जाणार आहे. या सर्व सेवा अत्यावश्यक असल्यामुळे कर्मचारी भरती न झाल्यास नागरिकांना देण्यात येणार्‍या सुविधांवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे ही भरती होणे आवश्यक असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावर यांनी सांगितले. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यामुळे हजारो बेरोजगारांचे पालिकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे

Post Bottom Ad