क्षयरोग निर्मूलनासाठी नगरसेवकांनी घेतली 'शपथ' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 November 2017

क्षयरोग निर्मूलनासाठी नगरसेवकांनी घेतली 'शपथ'

मुंबई | प्रतिनिधी 23 Nov 2017 - जगात क्षयरोगाचे प्रमाण वाढत असून भारतातही याचे प्रमाण अधिक आहे. या रोगाचे निर्मूलन करण्यासाठी आरोग्य संघटना व भारत सरकारने कंबर कसली आहे. मुंबईतही वाढती लोकसंख्या, लोकांच्या सवयी, उपचाराबाबतचे गैरसमज असल्याने हा रोग झपाट्याने पसरत आहे. यामुळे नगरसेवकांनी याबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेतला असून गुरुवारी महापालिकेच्या सभेत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी क्षयरोगाच्या नियंत्रणासाठी निवेदनाद्वारे शपथ घेत, लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांना सजग करण्याची घोषणा केली. 

जगातील एकूण ८.६ दशलक्ष क्षयरोग रुग्णांपैकी भारतात २.८ दशलक्ष रुग्ण दरवर्षी आढळून येत आहेत. जागतिक आरोग्य संघटना व भारत सरकारने २०३० पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचा उद्देश जाहीर केला आहे. सर्व राज्यांना व मोठ्या शहरांना युध्द पातळीवर काम करणे गरजेचे आहे. मुंबई महापालिकेचे क्षयरोग नियंत्रण विभाग क्षयरोग नियंत्रणाकरिता राज्यात अग्रेसर आहे. त्यामुळे बऱ्याचशा उपाययोजना मुंबई शहरात सुरु झाल्या आल्या आहेत. मात्र, मुंबई शहरापुढे अनेक आव्हाने असून त्यात वाढती लोकसंख्या, शहरीकरण, स्थलांतरण, लोकांच्या सवयी, जाणीवतेची कमतरता आणि उपचाराबाबत गैरसमज आदी कारणांमुळे क्षयरोगाची वाढ होण्याचा धोका आहे. ह्या क्षयरोगाचे नियंत्रण करण्याचे आव्हान गंभीर लक्षात घेवून मुंबईतील लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे निवेदन महापौर विश्वनाथ महाडेश्वर सभागृहात केले. मुंबईत जनजागृती करणे, रोगाचे लक्षण ओळखून रुग्णांना दवाखान्यात पाठवणे, रुग्णांवर उपचार सुरु असताना सामाजिक व कौटुंबिक आधार देणे, उपचार अर्धवट सोडलेल्या रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी, रुग्णांना औषधाेपचार घेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रोत्साहित करावे, अशी प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली. 

Post Bottom Ad