गुजरात | अजेयकुमार जाधव -
गुजरातमध्ये विधानसभेची निवडणुक डिसेंबरमध्ये होत आहे. ही निवडणुक दोन टप्प्यात होत असून प्रचारात हळूहळू रंगत चढू लागला आहे. राजकीय पक्ष विविध प्रचारासाठी विविध प्रयत्न करत असताना भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "मन की बात"चा सहारा घेऊन प्रचार सुरू केला.
या कार्यक्रमाला, भाजपाचे मुंबई महापालिकेतील गटनेते मनोज कोटक, पदाधिकारी रवी टन्ना, कुलकर्णी आदी मान्यवर,मुंबईतील पत्रकार उपस्थित होते. या मनकी बात च्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी एक प्रकारे गुजारातवासीयांना गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजप प्रणित सरकारची सत्ता स्थापन करण्याचा या माध्यमातून अप्रत्यक्ष संदेशच दिला आहे. गुजरात भाजपाने पोरबंदर परिसरात २० ठिकाणी मन की बात कार्यक्रम जनतेपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी खास व्यवस्था केली होती. पोरबंदर कँकय्या मंदिर येथे याप्रसंगी भाजपातर्फे खास आयोजन करण्यात आले होते.
तसेच आणखीन काही ठिकाणीही मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी, भाजपाच्या पदाधिकाऱयांच्या लहान मुलांनी भाजपाचा झेंडा हातात घेत गल्लोगल्लीत,मैदानात,रस्त्यावर भाजपाचा प्रचार केला.या कार्यक्रमाला महिलानी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले. मन की बातच्या माध्यमांतून भाजपाने आपल्या उमेदवारांचा प्रचार करीत आपल्या पक्षाला, उमेदवाराला घरोघरी पोहचविण्याचा प्रयत्न केला