विधानपरिषदेच्या एका जागेसाठी 7 डिसेंबरला मतदान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 November 2017

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी 7 डिसेंबरला मतदान


मुंबई । प्रतिनिधी - 
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 7 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांकडून एका सदस्याची निवडणूक घेण्यासाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अनंत कळसे यांनी कळविले आहे.

नामनिर्देशन पत्रे उमेदवाराला किंवा त्याच्या सूचकाला महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अनंत कळसे किंवा महाराष्ट्र विधानमंडळाचे उप सचिव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर किंवा महाराष्ट्र विधानमंडळाचे अवर सचिव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उमेश शिंदे यांच्या पुढे 27 नोव्हेंबर पर्यंत कोणत्याही दिवशी (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत, कक्ष क्रमांक 140, पहिला मजला, विधानभवन, मुंबई येथे मिळतील व याच ठिकाणी दाखल करता येतील. नामनिर्देशन पत्राची छाननी 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता विधान भवन, मुंबई येथे करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याबद्दलची सूचना उमेदवाराला किंवा त्यांच्या कोणत्याही सूचकामार्फत किंवा ती सूचना देण्याचे लेखी अधिकार उमेदवाराकडून देण्यात आलेल्या त्याच्या निवडणूक एजंटाला वरील निर्दिष्ट केलेल्या अधिकाऱ्यास त्यांच्या कार्यालयात दि. 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत देता येईल. निवडणूक लढविली गेल्यास दि.7 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेर्यंत मतदान घेण्यात येईल, अशी माहिती कळसे यांनी दिली आहे.

Post Bottom Ad