कंत्राटी सफाई कामगारांसाठी सुप्रिया सुळे महापालिकेत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 November 2017

कंत्राटी सफाई कामगारांसाठी सुप्रिया सुळे महापालिकेत


मुंबई 10 Nov 2017 -
मुंबई महानगरपालिकेच्या 2700 कंत्राटी सफाई कामगारांना सेवेत कायम रूजू करण्याचे आदेश न्य़ाय़ालयाने दिले आहेत. मात्र आतापर्यंत फक्त 290 सफाई कामगारांनाच सेवेत रुजू केले आहे. रुजू झालेल्या कामगारांना तीन महिन्यांचे वेतनही मिळालेले नाही. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. यावेळी कंत्राटी कामगारांचे नेते मिलिंद रानडेही उपस्थित होते.

मुंबई महापालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना कायम सेवेत रुजू करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. न्यायालयाने 2700 कर्मचा-यांना सेवेत रुजू करण्याचे आदेश दिले असतानाही आतापर्यंत अवघ्या 290 कंत्राटी कामगारांना सेवेत रुजू करण्यात आले आहे. जे रुजू झाले अशा कामगारांना 3 महिन्यांचे वेतन न मिळालेले नाही. शिवाय दिवाळीचा बोनसही दिला नाही. त्यामुळे कंत्राटी कामगारांमध्ये संतापाच्या प्रतिक्रिया आहेत. काहींच्या भविष्य निर्वाहनिधीत पैसे जमा करण्यात आलेले नाहीत. कंत्राटी सफाई कामगारांच्या अनेक समस्या घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. या सर्व कर्मचाऱ्यांचे प्रश्न आयुक्तांसमोर मांडले. यावर तोडगा काढण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. महिना अखेरीस यातील काही प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आयुक्त मेहता यांनी दिले, असे सुशे यांनी सांगितले. यावेळी कंत्राटी कामगारांचे नेते मिलिंद रानडे व सफाई कर्मचारी उपस्थित होते.

Post Bottom Ad