शिवसेना पाईपलाईन विस्थापितांच्या पाठीशी खंबीरपणे उभी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 November 2017

शिवसेना पाईपलाईन विस्थापितांच्या पाठीशी खंबीरपणे उभी


तोड कारवाईला स्थगितीसाठी जनहित याचिका दाखल -
मुंबई । प्रतिनिधी 17 Nov 2017 -
पवई तुंगा व्हिलेज प्रभाग क्रमांक 156 च्या पाईपलाईन लगतच्या झोपड्डी धारकावर मुंबई महापालिकेने कारवाई करण्यापूर्वी झोपडीधारक , दुकानदार आणि रहिवाश्याचे प्रश्न सोडवणे आवश्यक असून त्याचे पुर्नवसन करताना त्याची बाजू समजून घेणे महत्वाचे आहे. तूर्तास ही कारवाई स्थगित करावी या करिता शिवसेनेचे अशोक माटेकर यांच्या प्रयत्नातून जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

मुंबई शहर आणि उपनगराना पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यालगत उभारण्यात आलेल्या झोपड्या उच्च न्यायालयाने हटविण्याचे आदेश दिले आहेत घाटकोपर परीसरातील जलवाहिनी लगतची कारवाईनंतर पवई तुंगा व्हिलेज साकीनाका येथील जलवाहिन्या मोकळ्या करण्याकरिता कुर्ला एल विभागाने नोटीस बजावली आहे. न्यायालयाने महापालिकेला 31 डिसेंबरची मुदत दिली आहे. प्रभाग क्रमांक 156 मधील मिलिंद नगर , उदय नगर साकिनाका परिसरातील झोपड्यावर महापालिकेची कारवाई होत आहे. झोपडीधारकाकडे सन 2000 ची सर्वेक्षण पावती असताना देखील शेकडो झोपडधारकाना अपात्र ठरविण्यात आले आहे. या झोपडीधारकांनी 2000 पूर्वीची कागदपत्रे महापालिकेकडे सादर केली आहेत. पालिकेने अनेकांना अपात्र केले झोपडीधारकांची बाजू समजून घेणे आवश्यक आहेत सध्या शाळा सुरु आहेत वार्षिक परिक्षा झाल्यानंतर पुर्नवासनाबाबत कारवाई करावी तूर्तास ही कारवाई स्थगित करण्यात यावी या करिता शिवसेनेचे अशोक माटेकर यांच्या सूचनेनुसार सहकारी स्वप्नील धुरी यांनी जनहित याचिका केली असून महापालिकेला त्याची प्रत सादर केली आहे. येथील झोपडीधारक रहिवाश्याना एच डी आय एल कुर्ला कमानी येथे पुनर्वसन करण्यात यावे या करिता नगरसेविका अश्विनी अशोक माटेकर यांनी मुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री, महापालिका आयुक्त, महापौर यांच्याकडे पाठपुरावा केलेला असून झोपडीधारकाना तीन किलोमीटर अंतराच्या आत पुनर्वसन करावे अशी मागणी केली आहे. सोमवार दि 20 नोव्हेंबर 2017 रोजी या जनहित याचिकेवर न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Post Bottom Ad