मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांवर जल विद्युत प्रकल्प उभारा - रमेश कोरगांवकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 November 2017

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांवर जल विद्युत प्रकल्प उभारा - रमेश कोरगांवकर


मुंबई । प्रतिनिधी 5 Nov 2017 -
राज्यात विजेची समस्या निर्माण झाली असताना मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा तलावाच्या ठिकाणी जल विद्युत प्रकल्प कार्यान्वित केला आहे. मुंबईतही अशाच असेच जल विद्युत प्रकल्प मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अन्य तलावांच्या ठिकाणीही उभारण्यात यावेत, अशी सूचना स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर व स्थायी समिती सदस्यांनी केली आहे.

स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर व स्थायी समिती सदस्यांनी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोडक सागर, तानसा तलाव आणि पिसे- पांजरापोळ जलशुद्धीकरण प्रकल्प इत्यादी ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी, स्थायी समिती अध्यक्ष व सदस्यांना पालिका जल अभियंते अशोक कुमार तवाडीया यांनी मुंबईला तानसा, मोडक सागर व अन्य महत्वाच्या तलावांमधून कशा प्रकारे पाणी पुरवठा केला जातो तसेच पाणी शुद्धीकरण कश्या प्रकारे केले जाते, याबाबतची माहिती यावेळी दिली. या भेटीदरम्यान तानसा तलावातील पाण्यावर पालिका जल अभियंता विभागाच्या अभियंत्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जलविद्युत निर्मिती प्रकल्प यशस्वी रित्या राबविला असल्याची माहिती दिली. या जलविद्युत प्रकल्पामुळे तानसा परिसरात वीज वापर करून दरमहा दोन लाख रुपयांच्या वीज बिलापोटी होणाऱ्या खर्चाची बचत कशी होते याबाबतची माहिती अशोक कुमार तवाडीया यांनी स्थायी समिती अध्यक्ष व सदस्य यांना दिली. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, शिवसेनेचे स्थायी समिती सदस्य आशिष चेंबूरकर, समिक्षा सक्रे, सदा परब तर भाजपाच्या माजी महापौर व सदस्या अलका केरकर, राजेश्री शिरवडकर व अभिजित सावंत यांच्यासह पालिका जल विभागाचे अभियंते व अधिकारी उपस्थित होते.

Post Bottom Ad