मोकळ्या भूखंडावरून विरोधकांची घोषणाबाजी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 November 2017

मोकळ्या भूखंडावरून विरोधकांची घोषणाबाजी


मुंबई | प्रतिनिधी -
मुंबईमधील मोकळ्या भूखंडाबाबत पालिकेने बनवलेल्या नव्या धोरणाला सभागृहाने नुकतीच मंजुरी दिली होती. या धोरणाला मंजुरी देताना गाफील राहिलेल्या विरोधकांनी आज या धोरणाबाबत आक्षेप घेत विरोध केला. यावेळी सभागृहात गोंधळ घालत घोषणा बाजी केली. सत्ताधारी शिवसेना- भाजपचा निषेध करणारे बॅनर फडकवण्यात आले.

मुंबई महापालिकेने दत्तक तत्वावर दिलेले मोकळे भूखंड राजकीय व त्यांच्या संस्थांनी लाटले होते. हे भूखंड परत घेण्याबाबतच्या नव्या धोरणाला गुरुवारी कोणतीही चर्चा न करता पालिका सभागृहात मंजुरी देण्यात आली. मुंबईमधील मोकळे भूखंड राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि त्यांच्या संस्थांनी लाटले होते. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना पक्ष सोडल्यास भाजपा, विरोधी पक्षातील काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, समाजवादी पक्ष या सर्वच पक्षांनी महापालिकेच्या जुन्या धोरणाला विरोध केला होता. त्यानंतर असे भूखंड पुन्हा राजकीय नेते आणि त्यांच्या संस्थाना देण्याचे धोरण मुंबई महानगरपालिकेने बनविले होते. मुख्यमंत्र्यांनी या धोरणाला स्थगिती देवून नवीन धोरण बनवण्याचे निर्देश आयुक्तांना दिले होते. यानुसार महापालिका प्रशासनाने नव्याने प्रस्ताव सादर केला. पालिकेन नवे धोरण तयार केले. मात्र 216 पैकी 128 भूखंडच पालिकेने ताब्यात घेतले. त्य़ामुळे अजूनही 88 भूखंड पालिकेने ताब्यात घेतलेले नसताना नवे धोरण कोणतीही चर्चा न करता सभागृहात मंजूर करण्यात आले. या धोरणानुसार संबंधित संस्थांना 11 महिन्यांच्या करारावर देखभालीसाठी देण्यात येणार आहेत. गुरुवार नंतर आज सोमवारी विरोधकांनी मोकळ्या भूखंडाबाबतचे धोरण नामंजूर करावे व यावर सभागृहात चर्चा करावी अशी मागणी केली. महापौरांनी ही मागणी धुडकावून लावत सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात केली. त्यामुळे आक्रमक झालेल्या विरोधकांनी
घोषणाबाजी करत सभागृहात बॅनर फडकवले. यावेळी महापौर हाय हाय, दादागिरी नही चलेगी, शिवसेना भाजपा हाय हायच्या घोषणा देण्यात आल्या. यामुळे सभागृहातील वातावरण तंग झाले होते.

Post Bottom Ad