मुंबई 8 Nov 2017 – नोटाबंदीचं करायचं काय, मोदीला मत द्यायचं नाय...ये तो सिर्फ झांकी है, अभी इलेक्शन बाकी है...मोदी सरकार हाय-हाय...अशा गगनभेदी घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने नोटाबंदीचे वर्षश्राध्द घालण्यात आले. त्यानिमित्ताने आज मुंबईच्या सीएसएमटी स्टेशनसमोर मोदी सरकारच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यभर एकाचवेळी सरकारच्या फसलेल्या नोटाबंदी निर्णयावरोधात वर्षश्राध्द आंदोलन करण्यात आले.
आज सकाळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई सीएसएमटी स्टेशनसमोर नोटाबंदीच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. पक्षाच्यावतीने राज्यात नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त काळा दिवस पाळण्यात येत आहे. मुंबई सीएसएमटी स्टेशनसमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आंदोलन करताना मोदी सरकार हाय-हाय अशा घोषणा देत भाजप सरकारच्या फसलेल्या नोटाबंदीबाबत तीव्र संतापही व्यक्त करण्यात आला.
सीएसएमटी स्टेशनसमोर आंदोलन केल्यानंतर घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आझाद मैदानावर विधीव्रत वर्षश्राध्द घालण्यात आले. यावेळीही मोदी सरकारच्या नावाने जोरदार घोषणा देण्यात आल्या. आझाद मैदानावर घालण्यात आलेल्या वर्षश्राध्द विधीच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला.
या आंदोलनामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, विधानपरिषदेच्या आमदार विदयाताई चव्हाण, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, माजी आमदार अशोक धात्रक, आदींसह पक्षाचे युवक कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या आणि नेतेमंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.
नोटाबंदीमुळे जनताच सरकारला पायउतार करेल – प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे
काळापैसा मोठयाप्रमाणात बाहेर काढला जाईल, जनधन योजनेमध्ये सामान्य माणसाला मदत केली जाईल, बेरोजगारांना रोजगाराची निर्मिती केली जाईल अशी आश्वासने सरकारने दिली परंतु नोटाबंदीच्या आत्मघातकी निर्णयामुळे सामान्यांना रोजगार मिळाला नाहीच पण ज्यांच्याकडे वर्षानुवर्ष असलेला रोजगारही या सरकारने हिरावून घेतला अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आज केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने नोटाबंदीला एक वर्ष झाल्याबद्दल वर्षश्राध्द घालण्याचे आंदोलन करण्यात आले. सुनिल तटकरे पुढे म्हणाले की, देशात नोटाबंदीचा निर्णय झाल्याने आर्थिक चालना मिळेल असे वाटले परंतु असे काही घडले नाही उलट आर्थिक मंदीकडे देश वळला आहे. नोटाबंदीमुळे अतिरेकी कारवाया थांबल्या नाहीत तर भारताच्या सीमेवरती अतिरेकी कारवाया वाढल्या. त्याच्यामुळे या देशाती जनधन खात्यामध्ये एक रुपया सुध्दाही जमा झाला नाही उलट आर्थिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्यामुळे आज महागाई प्रचंड वाढली. शेतकरी, शेतमजुर उध्वस्त झाला आहे. व्यापार मंदावला आहे, उदयोग थांबला त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजवण्याचे काम या निर्णयामुळे झाले असल्याचा आरोपही तटकरे यांनी केला. यावेळी सुनिल तटकरे यांनी नोटाबंदीच्या काळात रांगेत उभे राहून मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रध्दांजली वाहिली.
नोटाबंदी निर्णयाचा हा घोटाळा येणाऱ्या काळात समोर येईल – विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे

सरकारचा नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला असून भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय म्हणजे या देशातील सगळयात मोठा घोटाळा आहे तो येणा-या काळात समोर आल्याशिवाय राहणार नाही अशी टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नोटाबंदी वर्षश्राध्द आंदोलनाप्रंसगी केली.
या देशातील १२५ कोटी जनता काळापैसा आहे कुठे असे विचारत आहे. सरकारने देशाला आर्थिक दिवाळखोरीकडे ढकलेले आहे. नोटाबंदीमुळे एक वर्ष मागे वळून पाहिले तर देशवासियांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळेच आम्ही सरकारचा धिक्कार करत आहोत असेही धनंजय मुंडे म्हणाले.