मुंबई । प्रतिनिधी - 9 Nov 2017 -
चेंबूर ते वडाळा दरम्यान चालणाऱ्या मोनोरेलच्या म्हैसूर कॉलनी स्टेशनजवळ दोन डब्ब्यांना आग लागली. हि आग इतकी भयानक होती त्यात मोनो रेलचे दोन डब्बे जळून खाक झाले आहेत. हि आग लागली त्यावेळी प्रवासी नसल्याने कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. मात्र पहाटे आग विझवल्यानंतरही सायंकाळी उशिरापर्यंत मेट्रोची वाहतूक सुरळीत झालेली नव्हती.
गुरुवारी सकाळी पहाटे 5.30 वाजता भक्ती पार्कहून चेंबूरला जाणारी मोनो रेल म्हैसूर कॉलनी स्टेशनजवळ आल्यावर या ट्रेनच्या शेवटच्या दोन डब्यांना आग लागली. या आगीची माहीती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आगीच्या ठिकाणी धाव घेऊन 5 वाजून 52 मिनिटांनी आग विझवली. या दुर्घटनेत मोनो रेलचे दोन्ही डबे जळून खाक झाले आहेत. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. मोनो रेलवे आधीच कमी प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. सकाळी पहाटेच्या वेळेस मोनो रेल्वेमध्ये कमी प्रमाणात प्रवासी असतात. सकाळी आग लागली त्यावेळी मोनोमध्ये प्रवासी कमी प्रमाणात असल्याने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. पहाटे लागलेली आग विझवल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत मोनोरेलची वाहतूक ठप्प झाली होती. याचा परिणाम म्हणून मोनो रेलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. दरम्यान ही आग सकाळी प्रवासी नसताना लागली म्हणून जिवीत हानी झाली नसलाई तरी हीच आग इतर वेळी प्रवासी असताना लागली असती तर जीवित हानी झाली असती. याची दखल घेऊन मोनो रेल प्रशासनाने प्रवाश्यांच्या जीवाची काळजी घेण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.