मेट्रो कारशेडसाठी वृक्षांची कत्‍तल थांबवा – महापौर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 November 2017

मेट्रो कारशेडसाठी वृक्षांची कत्‍तल थांबवा – महापौर


मुंबई | प्रतिनिधी -
कुलाबा ते सिप्‍झ दरम्‍यान आरे कॉलनीतील मेट्रो 3 कारशेडच्‍या कामासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. यापूर्वी झालेले वृक्षपुर्नरोपण पाहणीनंतर अयशस्‍वी ठरले आहे. त्यामुळे मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने मेट्रो कारशेडसाठी तोडण्‍यात येणाऱ्या वृक्षांची कत्‍तल थांबवावी, अशी मागणी मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केली आहे. मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी पालिका गटनेत्यांसमवेत वृक्ष प्राधिकरण समिती सदस्‍यांनी आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडच्‍या कामाची पाहणी केली. यावेळी ते बोलते होते.

महापौरांनी जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोडलगतच्‍या सारीफत नगर येथील कामाची सर्वप्रथम पाहणी केली. मागील सहा महिन्‍यापूर्वीची स्थिती व आताच्‍या वृक्षांबाबतची स्थिती याची माहिती मागविण्याच्या सूचना महापौरांनी मेट्रो 3 चे अधिकाऱ्यांना केल्या होत्या. यावेळी तोडण्यात येणाऱ्या वृक्ष, पुर्नरोपीत केले जाणारे वृक्षांची संख्‍या व कोणत्‍या जातीच्‍या वृक्षांची मोठया प्रमाणावर तोड होणार आहे, याचा अहवाल सादर करण्‍याची सूचना उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांना महापौरांनी केली. तसेच मेट्रो 3 च्‍या कामासाठी एकूण एक हजार दोनशे सत्‍ताऐंशी हेक्‍टर जागा लागणार अाहे. तेहत्‍तीस हेक्‍टरवर मेट्रो कारशेड उभारण्यात येणार आहे. त्‍यासोबतच एकूण 2 हजार 665 वृक्ष तोडण्‍यात येणार आहेत. वनविभागासोबत झालेल्‍या करारान्‍वये पुर्नरोपीत केलेल्‍या वृक्षांचे सात वर्षापर्यंत संवर्धन करण्‍याची जबाबदारी ही वनविभागाला देण्‍यात आली आहे, अशी माहिती मेट्रो 3 च्‍या अधिकाऱ्यांनी यावेळी महापौरांना दिली. त्यानंतर महापौरांनी शितलामाता परिसरातील पुर्नरोपीत करण्‍यात आलेल्‍या वृक्षांची पाहणी केली. वृक्ष मोठया प्रमाणात मृत पावल्‍याचे त्‍यांच्‍या निदर्शनास आल्‍यानंतर त्‍यांनी मेट्रो 3 च्‍या अधिकाऱ्यांचे याकडे होणारे दुर्लक्ष व पुर्नरोपीत करण्‍यासाठी सक्षम तंत्रज्ञान उपलब्‍ध का केले नाही ? याचा जाब मेट्रो 3 च्‍या अधिकाऱ्यांना यावेळी विचारण्यात आला.

Post Bottom Ad