पुलाचे बांधकाम 6 महिन्यात पुर्ण होणार -
मुंबई । प्रतिनिधी 16 Nov 2017 -
मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनसवर नवीन पादचारी पुल बनविण्याच्या निविदा प्रक्रिया 24 तासाच्या आत पुर्ण करूण निवेदेला अंतिम स्वरूप तसेच मंजुरी दिली. या प्रस्तावित पादचारी पुलाचा अंदाजे खर्च रूपये 2.97 करोड इतका आहे. सदर पादचारी पुलाचे बाधंकामाची सुरवात 16 नोव्हेंबर 2017 रोजी झाली आहे. या पुलाचे बांधकाम येत्या 6 महिन्यात पुर्ण होईल असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.
प्रवाशांना उत्तमोउत्तम सेवा देण्याच्या सतत प्रयत्नात असल्यामुळे लोकमान्य टिळक टर्मिनस येथील प्रस्तावित नवीन पादचारी पुलाची निविदा प्रक्रिया 24 तासाच्या आत पुर्ण करून अंतिम मंजुरी देण्याचा रेकॉर्ड केला. प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी आणि फायद्या साठी एखाद्या योजनेची स्वीकृती आणि कार्यान्वयन विना खोळंबा तत्काळ करण्यात येऊन एक नवा पायंडा पडला आहे. या पादचारी पुलासाठीची निविदा 14 नोव्हेंबर 2017 ला उघडण्यात आली आणि स्वीकृतीचे सर्व सोपस्कार त्याच दिवशी पार पडले. त्याप्रमाणे निविदा मंजुरीचे पत्र प्रत्यक्षात संबंधीत ठेकेदाराला प्रदान करण्यात आले. ठेकेदाराकडुनही कार्य स्वीकृतीचे पत्र त्याच दिवशी घेण्यात आले. लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवीन स्थानक इमारती जवळ मुंबई दिशेकडे हा पादचारी पुल बाधण्यात येणार आहे. सर्व पाचही फलाटांना जोडणारा सदर पादचारी पुलाची मार्गीका 6 मीटर रूंद असून आणि प्रत्येकी 18 मीटर लांबीचे स्पॅन असलेला बनविण्यात येणार आहे. नवीन पादचारी पुलाचा उतार फलाटाच्या एका दिशेला तर दुस-या दिशेला 2.50 मीटर रूंदीचे जीने बनविण्यात येतील असे उदासी यांनी सांगितले.