क्षयरोग निर्मुलनासाठी लोकप्रतिनिधींनी सक्रिय सहभाग घ्यावा - महापौर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 November 2017

क्षयरोग निर्मुलनासाठी लोकप्रतिनिधींनी सक्रिय सहभाग घ्यावा - महापौर


मुंबई । प्रतिनिधी 8 Nov 2017 -
बृहन्‍मुंबई महापालिकेच्‍या नगरसेवक, नगरसेविका यांनी क्षयरोगाची तीव्रता समजावून घेऊन आपल्‍या प्रभागातील क्षयरोग निर्मुलनासाठी सक्रीय सहभाग घेतला तरच या मोहिमेला अधिक चांगले यश मिळू शकेल, असे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केले. बृहन्‍मुंबई महानगरपालिका व आय.ए.पी.पी.डी, नवी दिल्‍ली यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने स्‍वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर येथे नगरसेवक, नगरसेविका यांच्‍यासाठी क्षयरोग नियंत्रणाबाबत कार्यशाळा आयोजित करण्‍यात आली होती, त्‍यावेळी उपस्थित नगरसेवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर मार्गदर्शन करताना पुढे म्‍हणाले की, क्षयरोगाचे निर्मुलन होणे किती आवश्‍यक आहे, याची तीव्रता याठिकाणी आल्‍यानंतर लक्षात आल्‍याचे महापौर म्‍हणाले. कार्यशाळेला गैरहजर असलेल्‍या नगरसेवकांना महापालिका सभागृहात महापौरांनी पाच मिनीटे मार्गदर्शन करण्‍याची महापालिका आयुक्‍तांची सूचना स्वागतार्य असल्‍याचे महापौरांनी सांगितले. वैद्यकीय महाविद्यालये व प्रमुख रुग्‍णालये यांचे संचालक डॉ.अविनाश सुपे यांनी अत्‍यंत उपयुक्‍त माहिती याठिकाणी सांगितल्‍याचे महापौरांनी सांगितले. लोकप्रतिनिधींचा आपआपल्‍या प्रभागात थेट संपर्क असल्‍याने त्‍यांनी आपल्‍या प्रभागातील क्षयरुग्‍णांना औषधांचा कोर्स हा पूर्ण करावाच मध्‍येच औषध घेणे बंद करु नये, आपल्‍याकडे येणाऱया महापालिका कर्मचाऱयांना सहकार्य करा अशी सूचना करण्‍याचे नगरसेवकांना शेवटी आवाहन केले.

महापालिका आयुक्‍त अजोय मेहता यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, भारताच्‍या लोकसंख्‍येच्‍या १ टक्‍के लोकसंख्‍या ही मुंबईची असून यामध्‍ये क्षयरुग्‍णांची लोकसंख्‍या ही अडीच टक्‍के आहे ही मुंबईकरांसाठी चिंताजनक बाब असल्‍याचे ते म्‍हणाले. केंद्रसरकारला २०२५पर्यंत क्षयरोग मुक्‍त भारत करायचा असून त्‍याप्रमाणे क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. आता यापुढे सरकारी किंवा खाजगी रुग्‍णालयातील क्षयरुग्‍ण असा कोणताही भेदभाव न होता क्षयरुग्‍णांची नोंद घेऊन त्‍यांच्‍या उपचाराचा पाठपुरावा करण्‍याची संपूर्ण जबाबदारी ही आता महापालिका, शासनाची असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. त्‍याचप्रमाणे क्षयरोगाबाबतचा उपचार कितीही महागडा असला तरी क्षयरुग्‍णांनी त्‍याला घाबरुन न जाता यावर मोफत उपचार करण्‍यात येत असल्‍याची जाणिव ठेवावी तसेच शासनातर्फेही ‘ क्षयरोगावर मोफत उपचार’ याप्रकारच्‍या जाहिराती प्रसारित करण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. लोकप्र‍तिनिधींनी सुध्‍दा क्षयरुग्‍णांच्‍या उपचाराबाबत प्रशासनाला प्रश्‍न विचारुन या आजाराबाबतच्‍या तीव्रतेची जाणिव करुन द्यावी अशी सूचनाही त्‍यांनी शेवटी केली.

याप्रसंगी उप महापौर हेमांगी वरळीकर, महापालिका आयुक्‍त अजोय मेहता, स्‍थायी समिती अध्‍यक्ष रमेश कोरगांवकर, सुधार समितीचे अध्‍यक्ष अनंत नर, स्‍थापत्‍य समिती (उपनगरे) अध्‍यक्ष तुळशीराम शिंदे, सार्वजनिक आरोग्‍य समिती अध्‍यक्षा रोहिणी कांबळे, विधी समिती अध्‍यक्ष अॅड. सुहास वाडकर, आय.ए.पी.पी.डी, नवी दिल्‍लीचे कार्यकारी सचिव मनमोहन शर्मा, चॅलेज टि.बी. ‘द युनियन’ चे संचालक डॉ. इमरान सय्यद, उप आयुक्त (आरोग्‍य सेवा) सुनिल धामणे, संचालक (वैद्यकीय महाविद्यालये व प्रमुख रुग्‍णालये) डॉ.अविनाश सुपे, कार्यकारी आरोग्‍य अधिकारी डॉ.पद्मजा केसकर, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख (माध्‍यमिक आरोग्‍य सेवा) डॉ. प्रदिप जाधव हे मान्यवर उपस्थित होते.

Post Bottom Ad