मुंबई 10 Nov 2017 - 300 कोटी रूपये खर्च करुन खोट्या जाहिरात बनवुन स्वतःची पाठ थोपटुन घेणे, जनतेची दिशाभुल करण्याचे काम सरकार करीत आहे. पण आज उस्मानाबाद जिल्ह्यातील ज्ञानेश्वर साळवे या तरुणाने शेतमालाच्या भावा करीता कोणीही दखल घेत नसल्याने थेट मंत्रालयात येवुन सातव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या करण्याचे आंदोलन केल्याने सरकारच्या खोटारड्या पणाचे पितळ उघडे पडले आहे.
आता तरी खोटी जाहिरातबाजी बंद करून सरकारने शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी तात्काळ खरेदी केंद्र सुरू करावीत, खरेदी केंद्रवरील शेतमालाच्या खरेदीसाठीच्या जाचक अटी काढुन टाकाव्यात आणि हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदीच्या ज्या तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या होत्या त्या मी शासनाकडे यापुर्वीच पाठवलेल्या आहेत. या सर्व तक्रारींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत. आणि शेतकर्यांना न्याय द्यावा.