विद्यार्थ्यांना रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटीफिकेशन ओळखपत्र द्या - समृद्धी काते - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 November 2017

विद्यार्थ्यांना रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटीफिकेशन ओळखपत्र द्या - समृद्धी काते


मुंबई | प्रतिनिधी 17 Nov 2017 - 
मुंबई महानगरपालिकेकडून करोडो रुपये खर्च करून पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सोयी सुविधा व शालेय वस्तू पुरण्यात येतात. मात्र त्यांनंतरही विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती कमी असल्याने शिक्षणाचा दर्जा घसरत असल्याची सातत्याने टिका होत असते. पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटीफिकेशन ओळखपत्र देण्यात यावे अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका समृद्धी काते यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.

पालिका शाळांमध्ये येणारे बहुसंख्य विद्यार्थी झोपडपट्टी विभागातून, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातून येत असतात. शैक्षणिक वातावरणचा अभाव आणि आर्थिक दुर्बलतेमुळे मुलांमध्ये शिक्षणाविषयीची आवड कमी असल्याचे दिसून येते. महापालिका अशा विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी शैक्षणिक साहित्य, टॅब आदी सुविधा पुरवते. कोट्यवधी रुपये यासाठी खर्च करते. मात्र, तरीही काही विद्यार्थी शाळेच्या नावाने घरा बाहेर पडल्यानंतर शाळेत न जाता इतरत्र फिरतांना दिसून येतात. याबाबतची माहिती त्यांच्या पालकांना नसते. अनेकदा पालकांनी तक्रार केल्यानंतर शालेय अनुपस्थितीबाबत मुख्याद्यापकांकडून माहिती देण्यात येते. अनुपस्थितीमुळे मुलांच्या अभ्यासावर याचा परिणाम होतो. पालक यामुळे शिक्षकांवर रोष व्यक्त करतात. यामुळे शाळेला दांडी मारणाऱ्या विद्यार्थ्यांना आळा घालण्यासाठी स्मार्ट ट्रॅकिंग चीप व ट्रान्समीटरसह रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटीफिकेशन ओळखपत्र देण्याची ठरावाची सूचना शिवसेनेच्या नगरसेविका समृद्धी काते यांनी केली आहे. या ओळखपत्रांमुळे शालेय विद्यार्थी नेमके कुठे आहेत, याची माहिती पालक व शिक्षकांना मिळेल. शिवाय, त्यांचे अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष देखील टाळता येईल, असे काते यांनी सूचनेत स्पष्ट केले आहे.

Post Bottom Ad