पालिकेचा गरवारे इन्स्टिट्यूटसोबत संयुक्त अभ्यासक्रम -
मुंबई | प्रतिनिधी 20 Nov 2017 -
मुंबई महानगरपालिकेने आपल्या कर्मचा-यांना आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका मुंबई विद्यापीठ व गरवारे इन्स्टि्यूटच्या सहाय्याने एक वर्षाचा संयुक्त अभ्यासक्रम राबवणार आहे. परळ येथील पालिकेच्या आपत्कालीन व्य़वस्थापन केंद्राच्या इमारतीत याचे धडे दिले जाणार आहे. या प्रस्तावास सोमवारी विधी समितीत मंजुरी मिळाली. या अभ्यासक्रमाला पालिका कर्मचाऱ्यांसोबत इतरांनाही प्रवेश दिला जाणार आहे.
मुंबईत आपत्ती व्यवस्थापनाचा एक वर्ष पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम गरवारे इस्टिट्यूटसोबत पालिका सुरु करणार आहे. परळ येथील पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या इमारतीत प्रशिक्षणाचे दोन वर्ग चालवले जाणार आहे. पहिले तीन वर्ष कर्मचा-यांना मोफत प्रशिक्षण दिले जाईल. वर्गात 40 प्रशिक्षणार्थी असतील. पालिका व्यतिरिक्त इतरांनाही या प्रशिक्षणात सहभागी होता, येईल, मात्र त्यांना शुल्क भरावे लागणार आहे. महापालिकेतील कर्मचारी विविध विभागात काम करीत असले तरी ते कोणत्या कोणत्या प्रकारे आपत्ती व्यवस्थापनाशी जोडलेले असतात. कर्म-यांनी याचे प्रशिक्षण पूर्ण केल्यास खाते स्तरावर आपत्कालीन व्यवस्थापनाच्या विविध पाय-यांमध्ये त्याचा योग्य वापर केला जाऊ शकतो.
रूग्णालयात मोठ्या प्रमाणावर जखमी रुग्ण दाखल झाल्यास त्यांच्यावर त्वरीत उपचार करण्याकरीता काय आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा असावा, रुग्णालय इमारतीचा आपत्कालीन आराखडा कसा असावा, रासायनिक, जैविक, आण्विक आणि अणुनैसर्गिक आपत्तीत रुग्णालयांची काय भूमिका असेल याबाबत आराख़डे तयार करणे ही कामे पद् विका प्राप्त वैद्यकीय अधिका-यांकडून करून घेतली जाऊ शकतात. भविष्यात सर्व रुग्णालयांमध्ये सुनिश्चित कार्यपध्दती म्हणून वापरता येणे शक्य होणार आहे. हा पाट्यक्रम सुरु केल्यामुळे महापालिकेच्या इच्छुक अधिकारी व कर्मचा-यांना आपत्ती व्यवस्थापनात तज्ञ करता येणार आहे. याशिवाय विविध औद्योगिक संस्था, कारखाने, शासकीय, अशासकीय संस्था, खासगी कंपन्या आदींमधील अधिकारी- कर्मचा-य़ांनी हे प्रशिक्षण पूर्ण केल्यास त्यांची आपत्कालीन व्यवस्थापन कामी मोठ्या प्रमाणावर मदत प्राप्त होऊ शकते, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.
मुंबईत अशा प्रकारचे प्रशिक्षण सुरु करणारी संस्था सद्या अस्तित्वात नाही. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेमार्फत दोन वर्षाचा एमएससी इन डिझास्टर मॅनेजमेंट हा पूर्णवेळ पाट्यक्रम आहे. याचे प्रशिक्षण शुल्क एका प्रशिक्षणार्थीला 2, 50,000 रुपये इतके आहे. कोणताही नवीन पाट्यक्रम सुरु करण्याकरीता लागणा-या आवश्यक पायाभूत सुविधा या गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करीअर एज्युकेशन अॅन्ड डेव्हलप संस्था या संस्थेकडे उपलब्ध आहेत. पायाभूत सुविधा वापरण्याकरीता एकूण शुल्काच्या 20 टक्के रक्कम गरवारे महापालिकेस देणार आहे. महागडे असणारे हे प्रशिक्षण पालिका कर्मचा-यांना पहिली तीन वर्ष मोफत दिले जाणार आहे. त्या बदल्यात गरवारेला पालिका कर्मचा-यांच्या प्रशिक्षणाचे शुल्क भरणार आहे.