भाजप नगरसेवकांचा वाद शेलारांच्या कोर्टात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 November 2017

भाजप नगरसेवकांचा वाद शेलारांच्या कोर्टात


मुंबई | प्रतिनिधी 10 Nov 2017 -
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या महापौर पदावर भाजपचा उमेदवार बसवण्यासाठी प्रयत्न सुरु असताना पक्षामधील नगरसेवकांचे आपसातील वाद समोर आले आहेत. नागरसेवकांमधील हे वाद भाजपच्या मुंबई अध्यक्ष अशिष शेलार यांच्या कोर्टात पोहचला आहे. भाजपातील दोन नगरसेवकांची गटबाजी चव्हाट्यावर आल्याने अशिष शेलार याबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबईत भाजप नगरसेवकांमध्ये अंतर्गत गटबाजीला उत आला आहे. दक्षिण मुंबईतील वार्ड क्रमांक 227 चे भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर आणि वार्ड क्रमांक 226 चे नगरसेवक हर्षिता नार्वेकर यांच्या विरुद्ध भाजपच्याच वार्ड क्रमांक 222 वॉर्डातील नगरसेविका रिठा मकवाना यांनी भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. तसेच वॉर्डात नार्वेकर विरुद्ध मकवाना अशी पोस्टरबाजी ही सुरू झाली आहे. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांमध्येच सुरू असलेली चिखलफेक आता चव्हाट्यावर आली आहे. माकवानी यांनी अशिष शेलारांना लिहलेल्या पत्रात नार्वेकरांची तक्रार केली आहे. माकवानी लिहतात, " नार्वेकर माझ्या वार्डात म्हणजेच वार्ड क्रमांक 222 मध्ये पोस्टर लावतात. त्यावर स्थानिक आमदारांचे फोटो लावत नाहीत. राष्ट्रावादीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेत आपल्या वार्डात 1 किलोच्या सारखरेच्या पिशव्या वाटण्यात आल्या. त्यावर नार्वेकरांचे फोटो असलेले स्टीकर चिकटावण्यात आले होते. नार्वेकर राष्ट्रवादीच्या लोकांना व भाजपशी गद्दारी केलेल्या लोकांनाही सोबत घेतात. प्रोटोकॉंल व शिस्तभंग करत असल्याची तक्रार रिठा मकवाणी यांनी पत्राद्वारे केली आहे.

Post Bottom Ad