मुंबई | प्रतिनिधी 9 Nov 2017 - उत्तर प्रदेश सरकारने भीम आर्मी भारत एकता मिशनचे संस्थापक अॅड.चंद्रशेखर आझाद यांच्या विरोधात केलेली रासुकाची कारवाई रद्द करावी या प्रमुख मागणीसाठी या संघटनेने आज मुंबईसह राज्यभरात निदर्शने करून राष्ट्रपती व राज्यपालांच्या नावे निवेदने दिली. गुजरातमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे नुकसान होवू नये या भीतीनेच उत्तर प्रदेश सरकारने हि कारवाई केल्याचा आरोप या संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी यावेळी बोलताना केला.
उत्तर प्रदेशातील सहारनपुर जिल्ह्यतील शब्बीरपूर गावात चर्मकार विरुद्ध ठाकूर अशा झालेल्या संघर्षाला जबाबदार ठरवीत उत्तर प्रदेश पोलीस प्रशासनाने जून २०१७ पासून भीम आर्मी भारत एकता मिशनचे संस्थापक अॅड.चंद्रशेखर आझाद यांना सहारनपुर तुरुंगात ठेवले आहे ५ नोव्हेंबर रोजी आझाद यांना सर्व प्रकरणात जमीन झाला असतानाच त्यांच्याविरोधात लगेच रासुका अंतर्गत कारवाई करण्यात आल्याने या घटनेचे महाराष्ट्रासह देशभरात तीव्र पडसाद उमटले. या कारवाईच्या विरोधात मुंबई महाराष्ट्रासह देशभरात निदर्शने करीत भीम आर्मी भारत एकता मिशनच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती निवेदनाद्वारे केली आहे .
मुंबईतील दादर पूर्व स्थानकासमोर अशोक कांबळे व मुंबई प्रमुख अॅड.रत्नाकर डावरे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली . भारतात सध्या भारत विरुद्ध् हिंदुस्थान असे चित्र उभे करण्यात आले असून मुस्लिमांना दहशतवादी आणि साविधानाला मानणारे दलित असतील तर त्यांना नक्षलवादी ठरविण्याचे षड्यंत्र सुरु असल्याचा आरोप अशोक कांबळे यांनी यावेळी बोलताना केला . भाजप सरकार असलेल्या गुजरात मध्ये सध्या निवडणुकीचा प्रचार सुरु असून जिग्नेश मेवानी आणि हार्दिक पटेल यांनी घेतलेल्या भाजपविरोधी भूमिकेमुळे हा पक्ष धास्तावला आहे, अशात अॅड.चंद्रशेखर आझाद यांची सुटका केली आणि त्यांनी देखील भाजप विरोधात भूमिका घेतल्यास भाजपला ते महागात पडू शकेल या भीतीमुळेच उत्तर प्रदेशातील योगी सरकारने आझाद यांच्याविरोधात षडयंत्र रचले असल्याचा आरोप कांबळे यांनी यावेळी बोलताना केला. योगी सरकारने आपली चूक लवकर न सुधारल्यास आम्ही आगामी काळात महाराष्ट्रात आणखी आंदोलने तीव्र करू असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला.

यावेळी या संघटनेच्या कोअर कमिटीचे राजू झनके, सुनील गायकवाड, सुनील थोरात रमेश बालेश, महिला आघाडीच्या महाराष्ट्र सरचिटणीस नेहाताई शिंदे, मुंबईचे प्रमुख संघटक दीपक हनवते गौतमीताई जाधव , दीपक हनवते, विनय जैसवार, बहुजन पंथरचे डॉ, बी. एस, कांबळे, नरेश मोरे, भीम आर्मी जिल्हाध्यक्ष संजय भालेराव, संतोष वाकळे, राजू कांबळे, अविनाश गायकवाड, पृथ्वीराज बनसोडे यांचीही भाषणे झाली. विशाल शाक्य, विक्रांत लवांडे, सुनील वाकोडे, सर्जेराव कांबळे, हरिशंकर जैसवार, अरुण जैसवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते