पर्यटकांसाठी बेस्टने विशेष सेवा सुरू करावी - अतुल शाह - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 November 2017

पर्यटकांसाठी बेस्टने विशेष सेवा सुरू करावी - अतुल शाह

मुंबई | प्रतिनिधी -
तोट्यातील बेस्टची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मुंबईला रोज भेट देणाऱ्या सरासरी साडेचार लाख पर्यटकांसाठी बेस्टने विशेष सेवा सुरू करावी, अशी सूचना नगरसेवक व बेस्ट समिती सदस्य अतुल शाह यांनी केली.

बेस्टच्या बैठकीत अतुल शाह यांनी बेस्टची आर्थिक स्थिती सुधारावी आणि प्रवाशांना अधिक चांगली सुविधा मिळावी यासाठी विविध सूचना केल्या. ते म्हणाले की, मुंबई शहरात रोज सुमारे साडेचार लाख पर्यटक भेट येतात. त्यांना विविध स्थळांना भेट द्यायची असते. पण बेस्टच्या बसने तेथे कसे पोहचायचे हे माहिती नसते. हे पर्यटक बेस्टकडे वळविण्यासाठी बेस्टने विविध ठिकाणांना भेट देण्यासाठीची पॅकेजेस सुरू करावीत. कुलाबा – फोर्ट – नरिमन पॉईंट भागात पर्यटनासाठी सुविधा ठरलेल्या निलांबरी व विभावरी या उघड्या बसेस आकर्षक कराव्यात. मुंबईत बेस्टच्या बसेसने पर्यटक विविध ठिकाणांना सहजपणे व किफायतशीर दरात कसे भेट देऊ शकतील, याची माहिती पुणे – नागपूर इत्यादी राज्याच्या अन्य शहरांमध्ये ठळकपणे उपलब्ध करून द्यावी. बेस्टची प्रतिमा सुधारण्यासाठी बेस्टचा ब्रँड अँबॅसॅडर नेमावा तसेच बेस्टचे टपाल तिकिट काढावे, असे त्यांनी सांगितले. आगामी काही वर्षांत विजेवर चालणाऱ्या गाडयांचे प्रमाण वाढणार आहे. म्हणून बेस्टच्या ठिकठिकाणी असलेल्या डेपोंमध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग केंद्रे सुरू करून महसुलाचा नवा मार्ग शोधावा, असेही ते म्हणाले.

Post Bottom Ad