अंधेरीत 2018 अखेरपर्यंत जागतिक दर्जाचा स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभा राहणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 November 2017

अंधेरीत 2018 अखेरपर्यंत जागतिक दर्जाचा स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभा राहणार


मुंबई | प्रतिनिधी 17 Nov 2017 -
विविध खेळांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणारा पहिला खुला स्पोर्ट कॉम्प्लेक्स तयार करण्याचा निर्णय़ पालिकेने घेतला आहे. अंधेरीच्या विरा देसाई रोडवर उभा राहणा-या या कॉम्प्लेक्सचे काम 2018 अखेरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, बास्केटबॉल, कब्बडी, खो-खोसह विविध खेळांसाठी जागतिक पातऴीवर सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. याबाबतची निविदा प्रक्रिया अंतीम टप्प्यात असून मंजुरी मिळाल्यानंतर कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुंबईत सुविधा उपलब्ध असलेला मल्टी स्पोर्ट्स कॉम्पलेक्स असला तरी येथे सर्व सामान्यांना सहजा सहजी प्रवेश मिळत नाही. त्यामुळे पालिकेने येथे मल्टी स्पोर्ट्स कॉम्पलेक्स उभारण्याचा निर्णय़ घेतला आहे. मुख्य पीचसह सरावासाठीही काही पीच बनवली जाणार आहे. यांमध्ये क्लबमॅच खेळली जाईल. झपाट्याने वाढणा-या लोकसंख्येच्यादृष्टीने हे कॉम्प्लेक्स उभारले जाणार असून उपनगरांतील लोकांना हे कॉम्प्लेक्स वरदान ठरणार आहे. येथे जॉगींग व सायकलींगचीही सुविधा असेल. सध्या अंधेरीत उपलब्ध असलेल्या कॉम्प्लेक्सवर फुटबॉलला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे सर्व खेळांसाठी उपलब्ध होईल, असे कॉम्प्लेक्स उभे करण्याचा नियोजन पालिकेचे आहे. सुमारे 49 हजार चौरस मिटर जागेवर हे विस्तारित स्पोर्ट कॉम्प्लेक्स साकारणार आहे. यांमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच संध्याकाळच्यावेळी जॉगिंगही करता येणार आहे.

Post Bottom Ad