मुंबई, दि. 1 Nov 2017 - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत ‘दक्षता जनजागृती साप्ताह - २०१७’ चे आयोजन करण्यात आले आहे. भ्रष्टाचारापासून मुक्तीसाठी या सप्ताहात जनजागृती करण्यात येणार आहे.
कोणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना किंवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंध प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1064,व्हॉट्सअॅप क्रमांक ९९३०९९७७००, दूरध्वनी क्रमांक ०२२-२४९२२६१८ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी आपल्या तक्रारी abcwebmail@mahapolice.gov.in आणि addlcpacbmumbai@mahapolice.gov.inया ईमेलवर कराव्यात, असेही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस आयुक्त केशव पाटील यांनी केले आहे.