पंढरपूर देवस्थान कमिटीवर वारकऱ्यांचीच समिती नेमावी - ह.भ.प. राजाभाऊ महाराज चोपदार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 October 2017

पंढरपूर देवस्थान कमिटीवर वारकऱ्यांचीच समिती नेमावी - ह.भ.प. राजाभाऊ महाराज चोपदार


मागणीसाठी 10 आॅक्टोबरला लाखो वारकरी आझाद मैदानावर धडकणार ! 
मुंबई । प्रतिनिधी - पंढरपूरचा पांडुरंग हे गोरगरीब कष्टक-यांचे दैवत आहे. येथे मोठ्या श्रद्धेने भाविक दर महिन्याच्या वारीसह आषाढी-कार्तिकीला मोठ्या प्रमाणात येत असतात. वारकºघयांच्या प्रथा परंपराचा विचार वारकऱ्यांनाच कळू शकतो. त्यामुळे पंढरपूर देवस्थान कमिटीवर केलेली राजकीय नियुक्ती रद्द करून वारकऱ्यांची कमिटी स्थापन करावी या मागणी साठी मुंबई येथील आझाद मैदानावर 10 आॅक्टोबर रोजी वारकरी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी येतील, असा विश्वास संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मानकरी ह.भ.प. राजाभाऊ महाराज चोपदार यांनी व्यक्त केला. या आंदोलनाला वारकरी संप्रदायाबरोबरच इतर संघटनांनीही पाठिंबा दिलेला आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघ येथे रराजाभाऊ महाराज चोपदार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी वारकरी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर, वारकरी युवा मंचचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्यासह विविध वारकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थिती होते. इतकेच नव्हे तर मुंबईतील वेगवेगळ्या संघटनांनी यावेळी वारकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यात माथाडी कामगारांचे नेते आमदार नरेंद्र पाटील, मुंबई सेवा दलाचे अध्यक्ष शरद कदम, व्यसमुक्ती मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास, मुंबई डबेवाला मंडळाचे सचिव सुभाष तळेकर, रेल्वे प्रवासी भजन महासंघाचे अध्यक्ष हनुमंत महाराज तावरे, त्याशिवाय रेल्वे हमाल मंडळ, दक्षिणायन, पंढरीच्या वारीला चित्ररूप देणारी कलागजर संघटनचे संदेश भंडारे, मराठी पत्र लेखक संघाचे अध्यक्ष रविंद्र मालुसरे, शिक्षक भारती, सानेगुरुजी स्मारक समिती याच्यासह अनेक संघटनांनी या वारकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. 10 ऑक्टोबरच्या आंदोलनात या सर्व संघटनांचे प्रतिनिधी सर्व शक्तीनिशी सहभागी होतील, अशी माहिती पत्रकार परिषदेत प्रास्ताविक करताना वारकरी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शामसुंदर महाराज सोन्नर यांनी दिली.

आंदोलना मागची भूमिका सांगताना राजाभाऊ चोपदार म्हणाले की, पंढरपूरच्या देवस्थान कमिटीवर राज्य सरकारने भाजपचे नेते अतुल भोसले यांची नियुक्ती केली आहे. अतुल भोसले यांनीच समितीचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मी पहिल्यांदा पंढरपूरला येत आहे, असे सांगिले होते. असे जर असेल तर अशी व्यक्ती वारक-यांचे प्रश्न कसे काय समजून घेऊ शकेल. ही माहिती आम्हाला वारीदरम्यान पंढरपुरात कळाली तेव्हा आम्ही आंदोलन केले होते. तेव्हा आम्हाला वारकऱ्यांच्या प्रतिनिधंींकना समितीत घेतले जाईल, असे सांगितले होते. मात्र अद्याप सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे 10 आॅक्टोबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर संतवीर बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली भजनी आंदोलन करण्यात येणार आहे. आताची समिती बरखास्त करून नवीन वारक-यांची समिती स्थापन करावी, अशी मागणीही यावेळी राजाभाऊ चोपदार यांनी केली.

Post Bottom Ad