मुंबई । प्रतिनिधी -
एल्फिस्टन दुर्घटनेनंतर रेल्वे परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करावी असा इशारा माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. राज ठाकरे यांनी इशारा देवूनही घाटकोपर रेल्वे परिसरातील फेरीवाल्यावर कारवाई केली गेली नसल्याने १५ दिवसाच्या डेडलाईनची आठवण रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यासाठी रेल्वेचे डेप्युटी अधिकारी सावरीया व जेना यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले आहे. डेडलाईनपूर्वी घाटकेापर रेल्वे परिसर फेरीवाला मुक्त न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलनकरून फेरीवाल्यांना हटवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
एल्फिस्टन पुलावर चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत 23 प्रवाशी मृत झाले होते. या दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे परिसरातील फेरीवाल्यांवर 15 दिवसात कारवाई करावी अन्यथा 16 दिवशी मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्याप्रमाणे काही रेल्वे परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली मात्र त्याला घाटकोपर रेल्वे स्थानक परिसर अपवाद ठरला आहे. घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांची उच्छाद मांडला आहे. मुंबई उपनगरातील घाटकोपर हे महत्वाचे जंक्शन असून घाटकोपर ते वर्सोवा या पहिल्या टप्प्यातील मेट्रोमुळे या स्थानकावर प्रवाशांची दर दोन मिनिटाला पुलावरून लाखो प्रवाशांची गर्दी होते . या स्थानकावरील पूल जरी रुंद असले तरी स्टेशन परिसर फेरीवाल्यांनी व्यापल्याने प्रवाशांना गर्दीतून कसा बसा मार्ग काढावा लागत आहे. स्टेशन परिसरात पूर्व आणि पश्चिमत शेअर रिक्षा चालक आणि फेरीवाल्यानी गराडा घातलेला आहे . 14 वर्षांपूर्वी बस क्रमांक 416 मध्ये अतिरेक्यांनी बॉम्ब स्फोट घडवल्याने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे स्थानक अतिमह्त्वाचे ठरते. प्रवाशांच्या सुरक्षेखातर दोन दिवसांत स्टेशन परिसर फेरीवाल्यापासून मोकळा करण्यात आला नाही तर मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून फेरीवाले हटवतील व परिसर मोकळा करतील असा इशारा रेल्वे प्रशासनाला देण्यात आला आहे.