अर्ज सादर करण्याकरिता २२ ऑक्टोबरपर्यंत मुदत
मुंबई, दि. १२ ऑक्टोबर २०१७ :-
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) मुंबई विभागातील विविध वसाहतीतील ८१९ सदनिकांच्या विक्रीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीस अनुसरून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. २२/१०/२०१७ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत असून अधिकाधिक नागरिकांनी आपल्या गृहस्वप्नपूर्ततेकरिता या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात दि. १० नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. सदर सोडतीकरिता माहितीपुस्तिका व ऑनलाईन अर्ज म्हाडाच्या htpps://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. याच संकेतस्थळावर अर्जदाराची नोंदणी दि. २१/१०/२०१७ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत केली जाणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास दि. २२/१०/२०१७ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यंदा प्रथमच अर्जदारांना NEFT / RTGS द्वारे अनामत रक्कम भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यंदाच्या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटाकरिताच्या सदनिकांचा समावेश आहे. सदर विविध उत्पन्न गटांकरिता दि. ०१/०४/२०१६ ते ३१/०३/२०१७ या कालावधीमध्ये असलेले अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न (पती + पत्नी यांचे एकत्रित उत्पन्न) या कालावधीत झालेल्या प्राप्तीवरून परिगणित करण्यात यावे. अत्यल्प उत्पन्न गटाकरिता सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न रु. २५,०००/ पर्यंत असावे. अल्प उत्पन्न गटाकरिता रु. २५,००१ ते रु. ५०,००० पर्यंत व मध्यम उत्पन्न गटाकरिता रु. ५०,००१ ते रु. ७५,००० पर्यंत तर उच्च उत्पन्न गटाकरिता अर्जदाराचे रु. ७५,००१ वा त्यापेक्षा जास्त सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम (परतावा) + अर्ज शुल्क (विना परतावा) अत्यल्प उत्पन्न गटाकरिता रु. १५,३३६/- प्रति अर्ज, अल्प उत्पन्न गटाकरिता रु. २५,३३६ प्रति अर्ज, मध्यम उत्पन्न गटाकरिता रु. ५०,३३६ प्रति अर्ज, उच्च उत्पन्न गटाकरिता रु. ७५,३३६ प्रति अर्ज आकारली जाणार आहे. यामध्ये ऑनलाईन अर्जापोटी प्रतिअर्ज रु. ३३६ (विना परतावा) अर्ज शुल्काचा समावेश आहे.

यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी प्रतीक्षा नगर- सायन, मानखुर्द, चांदिवली, मागाठाणे-बोरिवली या ठिकाणी एकूण आठ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. अल्प उत्पन्न गटाकरिता कन्नमवार नगर विक्रोळी, चारकोप कांदिवली (पश्चिम), सिद्धार्थ नगर - गोरेगाव (पश्चिम), चांदिवली, मानखुर्द, मालवणी मालाड येथील १९२ सदनिकांचा समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता प्रतीक्षा नगर- सायन, सिद्धार्थ नगर - गोरेगाव (पश्चिम), उन्नत नगर- गोरेगाव (पश्चिम), चारकोप कांदिवली (पश्चिम), गायकवाड नगर- मालवणी मालाड येथील एकूण २८१ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. तर उच्च उत्पन्न गटाकरिता लोअर परेल - मुंबई, तुंगा - पवई, चारकोप कांदिवली (पश्चिम), शिंपोली -कांदिवली (पश्चिम) येथील एकूण ३३८ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.
मुंबई मंडळातर्फे सर्व इच्छूक अर्जदारांना आवाहन करण्यात येते की, सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजन्ट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये. तसे केल्यास मुंबई मंडळ / म्हाडा कोणत्याही व्यवहारास / फसवणुकीस जबाबदार राहणार नाही.