प्रियदर्शनी पार्कमधील अग्निशमन केंद्र त्वरित हटवा - उच्च न्यायालय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 October 2017

प्रियदर्शनी पार्कमधील अग्निशमन केंद्र त्वरित हटवा - उच्च न्यायालय


मुंबई । प्रतिनिधी 30 Oct 2017 -
मलबार हिल येथील प्रियदर्शनी पार्कमध्ये पालिकेने मोठा गाजावाजा करत उभारलेले इकोफ्रेंडली अग्निशमन केंद्र ताबडतोब हटवावे असे आदेश देऊनही याकडे दुर्लक्ष करत असल्याने उच्च न्यायालयाने सोमवारी महापालिकेला चांगलेच धारेवर धरले. न्यायालयाचा आदेश मानायचा नसेल तर पालिका आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांची कारागृहात रवानगी करण्याची तंबीही उच्च न्यायालयाने यावेळी महापालिकेला दिली. यानंतर महापालिकेने प्रियदर्शनी पार्कमधील फायर इंजिन व तात्पुरत्या स्वरुपी बांधण्यात आलेली शेड मंगळवारी सकाळी हटविण्याची हमी न्यायालयाला दिली आहे. याप्रकरणी आता पुढील सुनावणी १ नोव्हेंबरला होणार आहे.

मलबार हिल येथील परिसरात आगीच्या घटनां त्वरित काबू मध्ये आणण्यासाठी प्रियदर्शनी पार्कमध्ये महापालिकेने अग्निशमन केंद्र उभारण्यात आले. हे केंद्र उभारताना महापालिकेने इको फ्रेंडली संकल्पना राबवली. मात्र या केंद्राच्या उभारणीमुळे पार्कमधील जॉगिंग ट्रॅक आणि वॉकिंग ट्रॅकवर नागरिकांना अडथळा निर्माण होऊ लागला. विरोध करत मलबार हिल सिटीझन फोरमने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. फायर इंजिन ठेवण्यासाठी पार्कमधील अनेक झाडे कापण्यात आली व प्रवेशद्वारही बदलण्यात आले, अशी तक्रार याचिकाकर्त्यांनी न्यायालयात केली. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे सुरु होती.

च्या मुळे पार्कमधील जॉगिंग व वॉकिंग ट्रॅकमध्ये अडथळा निर्माण होत असल्याचे उच्च न्यायालयाने यासंदर्भात नियुक्त केलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालत म्हटले आहे. या अहवालानंतर उच्च न्यायालयाने महापालिकेला प्रियदर्शनी पार्कमधून फायर इंजिन हटविण्याचा आदेश दिला होता. यावर पार्कच्या सहा हजार चौरस मिटर परिसरापैकी फक्त दहा चौरस मिटर जागेवर अग्निशमनचे इंजिन ठेवण्यात आले असल्याचे महापालिकेने न्यायालयाला सांगितले.

‘१९८७ च्या विकास आराखड्यानुसार, ही जागा फायर इंजिन स्टेशनसाठीच राखीव ठेवण्यात आली आहे. काही काळासाठी ही जागा संघटनेला देखभालीसाठी भाड्याने देण्यात आली. फायर इंजिनची जागा पार्कमधील एका कोपऱ्यात असून त्यामुळे जॉगिंग व वॉकिंग ट्रॅकला अडथळा निर्माण झाला नाही,’ असा युक्तिवाद महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी केला. मात्र, न्यायालयाने महापालिकेच्या या युक्तिवादावर आक्षेप घेतला. ‘आम्ही नेमेल्या स्वतंत्र समितीने फायर इंजिन जॉगिंग व वॉकिंग ट्रॅकसाठी अडथळा ठरत असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे अपघात होऊ शकतात. तुम्ही तातडीने फायर इंजिन आणि त्यासाठी उभारलेले तात्पुरते शेड हटवा, आणि पार्क पूर्वस्थितीत ठेवा. जॉगिंग व वॉकिंग ट्रॅक ‘झिकझॅग’ असू शकत नाहीत,’ असे न्यायालयाने म्हटले.

यानंतरही महापालिका ऐकत नसल्याचे पाहून न्यायाधिशांनी १९ जून रोजी दिलेल्या आदेशाचे पालन महापालिकेला करावेच लागेल. ‘तुम्ही स्वत:हून फायर इंजिन व शेड हटवा अन्यथा आम्ही कोर्ट रिसिव्हरला आदेश देऊ. ते पोलीस संरक्षणात जागा खाली करून घेतील. पार्कमध्येच फायर इंजिन ठेवण्यावर महापालिका का जोर देत आहे? तुमचे काय जाणार आहे? खराब रस्ते, खड्डे, अपघात यांस महापालिका कारणीभूत आहे. मात्र या सर्व समस्यांकडे दुर्लक्ष करून ही समस्या महापालिकेसाठी एकदम महत्वाची ठरली आहे. तुम्ही यात जास्त रस का घेत आहे? आता हा तुमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न झाला आहे,’ असे उच्च न्यायालयाने संतापत म्हटले.

Post Bottom Ad