मुंबई । प्रतिनिधी 26 Oct 2017 -
एल्फिस्टन रेल्वे स्थानकातील दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने नेमलेल्या समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकात सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत, नवे पादचारी पूल बांधले जाणार असून काही पूल दुरुस्त केले जाणार आहेत तर काही ठिकाणी सुरक्षा भिंत उभारली जाणार असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.
एल्फिस्टन दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय स्थानकांच्या पाहणीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अहवालातील काही महत्त्वाच्या बाबी पश्चिम रेल्वेद्वारे बुधवारी जाहीर करण्यात आल्या. तसेच एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी दिले आहेत. त्यानुसार, चर्चगेट ते विरार स्थानकादरम्यान 2 हजार 700 सीसीटीव्ही बसवण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे. सध्या पश्चिम रेल्वे स्थानकांत 1 हजार 60 सीसीटीव्ही कार्यरत आहे. यापैकी बहुतेक सीसीटीव्ही बदलून उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही लावावेत. या सीसीटीव्हीचे चित्रीकरण पाहण्यासाठी रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, स्थानिक पोलिस ठाणे, स्टेशन मास्टर या कार्यालयांत जोडणी देण्यात यावी असे अहवालात म्हटले आहे.
त्याचबरोबर पादचारी पुलांवरील प्रवाशांची अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी पुलावर वाय-फाय सेवा देणे बंद करण्याची शिफारस समितीने केली आहे. पश्चिम रेल्वेवर सुरक्षेसाठी आणि अतिक्रमण रोखण्यासाठी 17.5 किलोमीटर परिसरात सुरक्षा भिंत बांधली जाणार आहे. त्यासाठी एमयूटीपी-3 प्रकल्पाअंतर्गत भिंत उभारणे आणि पडलेल्या भिंतीच्या दुरुस्ती साठी साडेचार कोटी रुपये मंजूर केले आहेत. सुरक्षेसंबंधी सर्वाधिकार महाव्यवस्थापकांना 18 महिन्यांसाठी देण्यात आले आहेत. यामुळे महाव्यवस्थापकांच्या अखत्यारित असलेल्या शिफारसींच्या अमंलबजावणीस सुरुवात केली आहे. उर्वरित कामांचा प्रस्ताव बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. 15 दिवसांच्या आत त्याला मंजुरी मिळत असल्याने कामे जलद गतीने पूर्ण करण्यात येणार असल्याचे भाकर यांनी सांगितले
परेवर 36 नवे पादचारी पुल -
एल्फिन्स्टन पादचारी पूल दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांचे सुरक्षा ऑडिट करण्यात आले. चर्चगेट ते विरार मार्गावर स्थानकांची पाहणी केल्यानंतर गर्दीच्या 17 जुन्या पादचारी पुलांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. तसेच 12 नवे पादचारी पूल बांधण्यात येणार आहेत. तर संयुक्त समितीच्या शिफारसींनुसार पाच पादचारी पूल निर्माण करण्यात येणार आहे. एकूण 36 पुलांच्या टेंडरिंग प्रक्रियेस नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून त्यासाठी तब्बल 245 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रॅण्ट रोड, महालक्ष्मी, माहीम, विलेपार्ले, जोगेश्वरी, बोरिवली दक्षिण (रुंदीकरण), बोरिवली मध्य (वाढविणार), दहिसर, वसई, विरार या स्थानकात नवे पादचारी पूल बांधले जाणार आहेत. एल्फिन्स्टन रोड स्थानकातील अपघातग्रस्त अरुंद पादचारी पुलावर नवा 12 मीटर पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. जवळच स्कायवॉक उभारण्यात येणार आहे. तर मरीन लाइन्स (मध्य), चर्नीरोड (उत्तर), ग्रॅण्ट रोड (दक्षिण), मुंबई सेंट्रल (दक्षिण), मुंबई सेंट्रल (उत्तर), लोअर परेल (उत्तर), वांद्रे (मध्य ), सांताक्रुझ (दक्षिण), अंधेरी ( मध्य), गोरेगाव (मध्य), मालाड (दक्षिण), नायगाव (दक्षिण), वसई (मध्य), नालासोपारा (उत्तर) या ठिकाणच्या पुलांची पुनर्बाधणी केली जाणार आहे.