पश्चिम रेल्वेचे कर्मचारी चेक देण्यासाठी प्रवाशांच्या घरी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 October 2017

पश्चिम रेल्वेचे कर्मचारी चेक देण्यासाठी प्रवाशांच्या घरी


मुंबई । प्रतिनिधी -
एखादा अपघात घडल्यास किंवा दुर्घटना घडल्यास मृत आणि जखमी व्यक्तींना आर्थिक मदत मिळवण्यास सरकारी कार्यालयांच्या चकरा माराव्या लागतात. अशी परिस्थिती नेहमीच पाहायला मिळत असताना पश्चिम रेल्वेमात्र याला अपवाद ठरली आहे. एल्फिन्स्टन रोड स्थानकात चेंगराचेंगरीत ओळख पटलेल्या बळींच्या व जखमींच्या कुटुंबियांना काही तासांमध्येच रेल्वेकडून 1 कोटी 29 लक्ष 15 हजार रु.रकमेची एक्सग्रेशिया राशि वाटप करण्यात आली आहे. ’’आम्ही प्रत्येक मृत आणि जखमी व्यक्तिला त्याच दिवशी अंतरिम रक्कम देण्यासाठी प्रयत्‍न केले. रेकॉर्डस तपासून इतर व्यक्तिंच्या निवासस्थानी दुसऱ्या दिवशी आम्ही चेक पाठविले आहेत.’’ अशी माहिती पश्चिम रेल्वेचे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर मुकुल जैन यांनी दिली आहे.

पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन रोडस्थानकातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत मृत पावलेल्या 23 पैकी 22 व्यक्तिंच्या कुटुंबियांना आणि जखमी झालेल्या 34 व्यक्तिंना पश्चिम रेल्वेने आतापर्यंत एक्सग्रेशियाची रक्कम दिली आहे. ‘‘आम्ही चेक वितरीत करण्यासाठी सातारा आणि अलाहाबाद सारख्या ठिकाणांपर्यंत आमचे कर्मचारी पाठविले आहेत. प्रियंका बाळू पसालकर यांच्या वडिलांना चेक देण्यासाठी पुण्याजवळ असणाऱ्या गावात रविवारी पश्चिम रेल्वेचे कर्मचारी पाठविण्यात आले होते. ‘‘आम्ही आमची मुलगी गमावली आहे आणि कोणत्याच गोष्टीने त्याची भरपाई होऊ शकत नाही. परंतु रेल्वेने आमची गरज समजून घेतली आणि आमच्या गावापर्यंत ते आले, याबद्दल आम्ही रेल्वेचे आभारी आहोत.’’ अशी प्रतिक्रिया पसालकर यांनी दिली आहे. तर आपली आई गमावलेल्या निधी चंद्रशेखर शेट्टी यांनी ‘‘पश्चिम रेल्वेचे अधिकारी आमच्या घरी आले व त्यांनी चेक दिला.’’ असे सांगितले आहे. रेल्वेमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास आम्ही त्यांना वेळीच मदत करू शकतो असे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Post Bottom Ad