मुंबई | प्रतिनिधी 24 Oct 2017 -
शिवसेना शाखा क्रमांक 203च्या विद्यमाने लालबाग, परळ, काळाचौकी विभागातील बेरोजगार तरुण तरूणीसाठी 28 ऑक्टोबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी दिली.
शिवसेना शाखा क्रमांक 203च्या वतीने 28 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत साईबाबा पथ म्युनिसिपल शाळा, फ़िन्ले मिल जवळ, लालबाग, मुंबई 12 या ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात नॉन म्याट्रिक, दहावी, बारावी, पदवीधर, उच्च पदवीधर, इंजिनियर, इलेक्ट्रोनिक्स, बीपीओ, डिप्लोमाधारक, ब्याक ऑफिस, मार्केटिंग, ड्रायव्हिंग, डिलिव्हरी बॉय इत्यादी प्रकारच्या नोकरया बेरोजगारांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो, आधारकार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्राच्या 10 प्रतीसह नोंदणीसाठी शाखेमध्ये संपर्क साधावा असे आवाहन कोकिळ यांनी केले आहे. हा रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी शाखा प्रमुख किरण तावडे, महिला शाखा प्रमुख प्रियांका घाणेकर, युवा शाखा अधिकारी रोहित पाटेकर, भारतीय विद्यार्थी संघटनेचे शाखा संघटक एकनाथ सनस, ग्रामीण संपर्क प्रमुख शाखा संपर्क प्रमुख सचिन यादव इत्यांदींच्या मदतीने हा मेळावा यशस्वी केला जाईल अशी माहिती कोकीळ यांनी दिली.
Post Top Ad
24 October 2017
28 ऑक्टोबरला लालबाग परळ विभागात रोजगार मेळावा
Tags
# मुंबई-महाराष्ट्र
# शिक्षण-नोकरी-योजना
Share This
About Anonymous
शिक्षण-नोकरी-योजना
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.