फेरीवाल्यांविरुद्ध लढण्यापेक्षा सीमेवर जाऊन लढा. – रामदास आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 October 2017

फेरीवाल्यांविरुद्ध लढण्यापेक्षा सीमेवर जाऊन लढा. – रामदास आठवले


मुंबई / मिरारोड 21 Oct 2017 – गोरगरीब फेरीवाल्यांवर दादागिरी करीत त्यांच्यावर हल्ला करण्यापेक्षा मनसैनिकांनी लष्करात जाऊन सीमेवरती देशाच्या दुष्मनांशी लढावे. गरीब फेरीवाल्यांवर हल्ला झाला तर भीमसैनिक मनसैनिकांना चोख उत्तर देतील असा इशारा आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिला. मिरारोड येथील हॉटेल सनशाईन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते.

यावेळी बोलताना फेरीवाल्यांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांच्याबद्दलची तक्रार पोलीस आणि प्रशासनाला करता येऊ शकते. त्यांच्यावर प्रशासन कारवाई करेल मात्र मनसेने कायदा हातात घेऊ नये. मनसैनिकांनी गरीब फेरीवाल्यांवर दादागिरी करीत हल्ले करू नये. फेरीवाल्यांवर ज्या मनसैनिकांनी हल्ले केले आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी असे सांगत गरीब फेरीवाल्यांच्या रक्षणासाठी भीमसैनिक आणि आरपीआयचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील असा इशाराही रामदास आठवले यांनी दिला आहे. सामान्य जनतेतील 70 टक्के लोक फेरीवाल्यांकडूनच वस्तू घेतात. सरकारने ही फेरीवाल्यांबद्दल निश्चित धोरण ठरविले पाहिजे. दिल्लीत फेरीवाल्यांना मान्यता आहे. तशीच सन 2014 च्या निवडणुकीत मतदान केलेल्यांच्या झोपड्या पात्र ठरवाव्यात या मागणीप्रमाणेच सन 2014 पर्यंतचे फेरीवाले अधिकृत करण्यात यावे अशी रिपाइंची मागणी असल्याचे रामदास आठवले म्हणाले. भाजपा शिवसेनेने वाद करू नये आगामी निवडणुकांमध्ये भाजपा शिवसेनेने एकत्र येऊन निवडणूक लढावी असा सल्ला रामदास आठवलेंनी दोन्ही पक्षांना दिला. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा सोबत रिपब्लिकन पक्षाची युती होणार असून जास्तीत जास्त दलित मतदान भाजपाला मिळवून देण्यासाठी रिपाइं भाजपा सोबत राहील असेही रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले. 

भाजप सेनेने एकत्र यावे - 
भाजप शिवसेनेने वाद करू नये आगामी निवडणुकांमध्ये भाजप शिवसेनेने एकत्र येऊन निवडणूक लढावी असा सल्ला रामदास आठवलेंनी दोन्ही पक्षांना दिला.

Post Bottom Ad