आतंकवाद, नक्षलवाद आणि हिंसेला बौद्ध धम्म हेच उत्तर – रामदास आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 October 2017

आतंकवाद, नक्षलवाद आणि हिंसेला बौद्ध धम्म हेच उत्तर – रामदास आठवले

वर्धा – जगात वाढत असलेला आतंकवाद, नक्षलवाद आणि हिंसेला रोखण्यासाठी एकच उत्तर आहे ते म्हणजे बौद्ध धम्म असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. हिंगणघाट दीक्षाभूमीमध्ये आयोजित बौद्ध धम्म परिषदेच्या उदघाटन प्रसंगी आठवले बोलत होते.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्म चक्र परावर्तित केले . सम्राट अशोकानंतर जगातील ऐतिहासिक ठरणारे धम्मचक्र प्रवर्तन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांती ने झाले याचा आम्हाला अभिमान असल्याचे आठवले म्हणाले . जगात बौद्ध धम्मच सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगत मानव कल्याणासाठी बौद्ध धम्म हाच आदर्श जीवन मार्ग आहे. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पूर्ण करूया यासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन आठवले यांनी केले. यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष आमदार समीर पुनावा, रिपाइं चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुपेश थुलकर, केशव धाबर्डे, आर एस वानखडे, बाळू घरडे आदी अनेक मान्यवर तसेच भिक्कू उपस्थित होते. 

Post Bottom Ad