मुंबई दि. 20 ऑक्टोबर 2017 - संविधानाने आपल्या देशाचे नाव भारत असे अधिकृत केले आहे. प्रचिनकाळापासून असलेल्या भारतवर्ष या नावपासूनच भारत हे नाव आपल्या देशाचे राहिले आहे. विविध जातीधर्माचे लोक या देशात राहत असल्याने आपल्या देशाचा उल्लेख कोणी हिंदुस्थान असा करू नये तर भारत असाच उल्लेख केला पाहिजे. असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
मुलुंड पूर्व येथे आमदार सरदार तरसिंग यांच्या प्रयत्नातुन साकार झालेल्या उद्यानात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे आणि संत थिरुवल्लूवर यांच्या पुतळ्याचे उदघाटन केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला खासदार किरीट सोमय्या, रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, संयोजक डॉ. वरदाराजन, डॉ आंबेडकर फाउंडेशनच्या संचालिका योजना ठोकळे, स्थानिक नगरसेविका रजनी केणी, समिता कांबळे, नगरसेवक प्रकाश गंगाधरे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पत्रकार जगन्नाथ मोरे यांच्या साप्ताहिक निर्भीड च्या दिवाळी अंकाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलताना भाजपवर जरी हिंदुत्ववादी पक्ष असल्याचा आरोप असला तरी त्यांनी हिंदुस्थान जनता पक्ष असे पक्षाचे नाव घेतलेले नाही तर भारतीय जनता पक्ष असे नाव घेतले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा विकास साधत आहे. कोणताही भेदभाव न करता सर्व धर्मांना सोबत घेऊन न्याय देण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून भारत हा उल्लेख योग्य असून आपण विविध जाती धर्माचे लोक भारतीय म्हणून एकत्र आहोत. ही राष्ट्रीय एकात्मता महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे शक्य झाली आहे. एकमेकांच्या धर्माचा आदर करून आपण सर्वांनी भारतीय म्हणून एकत्र आलो पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता मजबूत ठेवूया असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले.