यापुढं फक्त गालावर टाळी - राज ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 October 2017

यापुढं फक्त गालावर टाळी - राज ठाकरे


मुंबई - 'नगरसेवक फोडून उद्धवने नीच राजकारण केलं आहे. मी हे कधीच विसरणार नाही आणि विसरलो नाही हे भविष्यात दिसेल. यापुढं हातावर नाही फक्त गालावर टाळी दिली जाईल,' असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेविरोधात संघर्ष सुरु झाल्याचा इशारा पत्रकार पारिषदेत दिला. मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेने फोडल्यावर मनसे व राज ठाकरे यांच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला. संपूर्ण मनसे शिवसेनेत विलीन झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. यामुळे राज यांनी 'कृष्णकुंज' निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण दिल.

राज यांनी अत्यंत तिखट शब्दांत उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला. 'उद्धव ठाकरे यांच्या नीच राजकारणामुळंच मला शिवसेना सोडावी लागली. तेच राजकारण आजही सुरू आहे. माझ्याकडून गेलेले सहा नगरसेवक कसे विकले गेले, हे साऱ्यांनाच माहीत आहे. पाच कोटी देऊन त्यांना खरेदी केलं गेलं. महाराष्ट्रातील जनतेला हे आवडलेलं नाही,' असं राज म्हणाले. 'लोकांचा रोष टाळण्यासाठी आता मीच हे नगरसेवक शिवसेनेकडं पाठवले अशा कंड्या पिकवल्या जात आहेत. पण मला पाठवायचे असते तर सातही पाठवले असते. एकाला कशाला ठेवला असता,' असा सवालही राज यांनी केला.

आणखी काय म्हणाले राज ठाकरे ---
> उद्धव ठाकरे यांच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून मी शिवसेनेतून बाहेर पडलो
> बाळासाहेबांना सांगून मी शिवसेनेतून बाहेर पडलो
> मला जर माणसं पाठवायची असती तर मी सात पाठवली असती
> शिवसेनेने खालच्या पातळीचे राजकारण केले
> मनसे नगरसेवकांना ५-५ कोटी रुपये दिले
> उद्धव ठाकरे यांच्याकडून नीच राजकीय खेळी खेळली गेली
> नगरसेवक फोडून उद्धव ठाकरेंनी नीच राजकारण केलंय.
> शिवसेनेने केलेली फोडाफोडी मी कधीच विसरणार नाही
> मनसेमधून शिवसेनेत गेलेले सहाही नगरसेवक विकले गेले आहेत

Post Bottom Ad