एल्फिस्टन दुर्घटनेप्रकरणी रेल्वे अधिकाऱ्यांना संसदीय समितीचे समन्स - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 October 2017

एल्फिस्टन दुर्घटनेप्रकरणी रेल्वे अधिकाऱ्यांना संसदीय समितीचे समन्स


मुंबई । प्रतिनिधी 29 Oct 2017 -
मुंबईतील एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीची व त्यामुळे झालेल्या मृत्यूंची दखल रेल्वेच्या संसदीय स्थायी समितीने घेतली आहे. या प्रकरणी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी 9 नोव्हेंबरला नवी दिल्ली येथे रेल्वेच्या संसदीय स्थायी समितीसमोर हजर राहावे असे समन्स बजावण्यात आले आहेत.

29 सप्टेंबर रोजी अचानक पाऊस पडल्याने पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकात सकाळी गर्दीच्या वेळी प्रवाशांची गर्दी जमा झाली होती. पूलावर गर्दी झाली असल्याने प्रवाशांना स्थानकाबाहेर पडता येत नव्हते. अचानक एका प्रवाशांकडे असलेल्या फुलांचा भारा खाली पडला. त्यामधून फुले खाली पडत असताना कोणी तरी फूल पडली म्हणून ओरडले. इतर प्रवाशांना पूल पडत असल्याचे वाटले आणि एकच गोंधळ निर्माण झाला होता. प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ केली आणि चेंगराचेंगरी होऊन 23 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेची गंभीर दखल रेल्वेच्या संसदीय स्थायी समितीने घेतली असून या चेंगराचेंगरीप्रकरणी मुंबईतील रेल्वेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण देण्यासाठी नवी दिल्ली येथे हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.

Post Bottom Ad